लक्षवेधी..
शुभम गजभिये…
विशेष प्रतिनिधी…
सुरक्षित प्रवासासाठी योग्य रस्ता असणे आवश्यक आहे.योग्य रस्ता नसेल तर आवागमन करताना नागरिकांची होणारी परवड धोक्यातील असते हे वास्तव सरळ सरळ आहे.
चिमूर तालुक्यातील मौजा उसेगाव वासियांना व विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण कामासाठी आणि शिक्षणासाठी मौजा नेरी येथे दैनंदिन आवागमन करावे लागते आहे.
मौजा नेरी ते मौजा उसेगाव रस्त्याची खास्ता हालत झाली असून या रस्त्याने पायदळ चालने सुध्दा मौजा उसेगाव वासियांना मुश्किल झाले आहे.
या रस्त्याच्या मजबूतीकरणाकडे सार्वजनिक बांधकाम उपविभाग चिमूर येथील प्रभारी उपविभागीय अभियंता यांनी पावसाळ्यापुर्वी लक्ष देणे आवश्यक आहे.
मौजा नेरी ते मौजा उसेगाव रस्त्यावरची उखळलेली गिट्टी अपघातास कारणीभूत ठरणारी आहे आणि नागरिकांचे व विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन ढासळवणारी आहे.
असे असताना चिमूर सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाचे अभियंता मौजा नेरी ते मौजा उसेगाव रस्त्याच्या मजबूतीकरणाकडे का म्हणून दुर्लक्ष करतात?हेच कळायला मार्ग नाही.
जिव थोडक्यात टाकून मार्ग पार करताना मौजा उसेगाव वासियांच्या नाकीनऊ येते आहे.येथील नागरिक योग्य रस्त्या विना असुरक्षित झाले असल्याच्या सत्याला चिमूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता केव्हा मान्य करतील?हा गंभीर प्रश्न आहे.
मौजा उसेगाव वासियांना मौजा नेरी येथे आवागमन करण्यासाठी सुरळीत आणि सुरक्षित रस्ता नसेल तर त्यांनी काय करयाला पाहिजे,हे तरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी सांगितले पाहिजे.
मौजा उसेगाव येथील नागरिकांना व विद्यार्थ्यांना अयोग्य रस्त्याची झळ सातत्याने सोसावी लागत असल्याने त्यांनी गावातच मरावे काय? याचे उत्तर कोण देणार?



