Home Maharashtra महाराष्ट्र महागौरव राज्यस्तरीय पुरस्कारासाठी शुभम पसारकर यांची निवड…

महाराष्ट्र महागौरव राज्यस्तरीय पुरस्कारासाठी शुभम पसारकर यांची निवड…

शुभम गजभिये… 

विशेष प्रतिनिधी… 

         बेघर,बेवारस,भिक्षेकरी, निराधार,अनाथ,मनोरुग्ण बांधवांच्या पुनर्वसनाचे कार्य करणाऱ्या शुभम राजू पसारकर यांना महाराष्ट्र महागौरव २०२५ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

           दिव्यवंदना आधार फॉऊंडेशनच्या माध्यमातून शुभम पसारकर गेली अनेक वर्षे अनाथ मनोरुग्णांच्या पुनर्वसनाचे कार्य चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात करीत आहेत.

         त्यांच्या कार्याची दखल घेऊन डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र यांनी घेतली व शुभम पसारकर यांची महाराष्ट्र महागौरव राज्यस्तरीय पुरस्कारासाठी जाहीर निवड केली.

         हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील,ग्राम विकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे,आयुष्यमान भारत महाराष्ट्र राज्य समिती अध्यक्ष डॉ.ओमप्रकाश शेटे यांचे उपस्थितीत पुणे येथे २५ मे २०२५ रोजी शुभम पसारकर यांना प्रदान करण्यात येणार आहे.मानपत्र,स्मृतीचिन्ह,शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

          अनाथ मनोरूग्णांच्या पुनर्वसनाचे कार्य करणाऱ्या शुभम पसारकर यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.