ऋषी सहारे
संपादक
आरमोरी – गडचिरोली वडसा रेल्वे मार्ग गेल्या दोन वर्षा पासून बांधकामाचे कार्य जोरात सुरू आहे परंतु रेल्वे प्रशासनाचे काही कंत्राटदार जवाईच बनले असल्या सारखे कामे घेत आहेत आणि करत आहेत पण सबंधित कामे जसे अंडर ग्राउंड पुलिया चे कामे ही निकृष्ट दर्जा होत असल्याचे बऱ्याच प्रत्यक्ष दर्शीचे व जाणकारांचे मत होत आहेत.
रेल्वेचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने त्यावर अंकुश लावण्याची मागणी जोर धरत आहे.
आरमोरी रामाळा रोड वरील रेल्वे च काम निकृष्ट दर्जाचे होत असून भर उन्हाळ्यात पाणी जमा राहत असून पावसात काय स्थिती निर्माण होईल याचे भाकीत करणे खूप कठीण आहे.
सदर काम हे गुजरात vrs कंपनी मागील दोन वर्षा पासून रेल्वेचे काम करीत आहे व या कंपनी सर्व कामे निकृष्ट दर्जाचे असून यावर सबंधित विभागाने लक्ष देऊन काम व्यवस्थित करावे अशी मागणी होत आहे.
मुरूम उत्खनन कार्यात कसूर करून बेकायदेशीर असल्याने सदर कंत्राटदारावर कारवाई झाली असल्याचे समजते.
मनमानी कारभार करून शासनाचा जावई ठेकेदारी करीत असल्याचे बोलल्या जात आहे.



