Home शैक्षणिक शिष्यवृत्ती परीक्षेत किसान विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय वडधा चे 32 विद्यार्थी ठरले...

शिष्यवृत्ती परीक्षेत किसान विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय वडधा चे 32 विद्यार्थी ठरले पात्र…  — यशस्वी ठरलेल्या सर्व पात्र विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने सत्कार….

अश्विन बोदेले 

जिल्हा प्रतिनिधी 

दखल न्यूज भारत 

 आरमोरी :- किसान विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय वडधा येथील विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखत याही वर्षी 32 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन करून शाळेचे नावलौकिक केले आहे. 

         यामध्ये इयत्ता पाचवीतील 14 विद्यार्थी व इयत्ता आठवीच्या 18 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यात इयत्ता पाचवीतील अथर्व खेवले , दिव्या मेंडुलकर , गणेश भोयर, कनक फुलबांधे, केतकी सेलोटे , निवेदिता सेलोटे , प्रांजली चापले, प्रथम सेलोटे, प्रियांशा मेश्राम, राधा दुर्बुळे , समर जांभुळकर, सोहम ठाकूर, सुमित बुरांडे , यश कावरे, आणि इयत्ता आठवीतील अंकुश विश्वास, आयुष जांभुळकर, नम्रता मेश्राम , परम नार्दस्वार , प्रिया मडावी , पियुष झरकर , प्रचित मंडल, प्रफुल मडावी, राणी विश्वास , रितू कुळे , शर्वरी हुलके , सोहम सेलोटे, तेजस्विनी चौके , टीना ठाकरे , तोषांत बदन , तुषार बोरघरे, वैष्णवी मानकर , यशस्वी भजभुजे आदी विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले आहेत.

         या विद्यार्थ्यांचा संस्थाध्यक्ष श्री. मदनजी मेश्राम साहेब, संस्थेचे सचिव श्री. प्रशांत मेश्राम, मुख्याध्यापक  श्री.एल.बी.भोयर सर यांनी विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.  

         विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेद्वारे आयोजित स्पर्धा परीक्षा करिता चालणारे विशेष वर्ग या उपक्रमाला दिले आहेत. या उपक्रमाद्वारे स्पर्धा परीक्षेची विशेष तयारी केली जाते.

        विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे श्री.आर.जे. खेवले सर श्री. आभारे सर,श्री .कोलते , श्री .सुकारे सर, श्री . हेडाउ सर , श्री .खरवडे सर , श्री .रामटेके सर ,  श्री .मेश्राम सर , श्री .गुरनुले सर यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.

         विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय संस्थाध्यक्ष मा. श्री. मदनजी मेश्राम, सचिव श्री. प्रशांत मेश्राम साहेब , मुख्याध्यापक श्री .एल .बी .भोयर सर, मार्गदर्शक शिक्षक व पालकांना दिले आहेत.