पंढरपूरातील विठ्ठल मंदिरावर पुन्हा बडवेराज येऊ देणार नाही… — फडकरी, दिंडीकरी, कीर्तनकार वारक-यांचा आळंदीत निर्धार..

 

दिनेश कुऱ्हाडे

  उपसंपादक 

पुणे विभागीय 

     आळंदी : अनेक वर्षांच्या संघर्षानंतर पंढरपूरचा पांडुरंग बडव्यांच्या विळख्यातून मुक्त झाला आहे. सर्व सामान्य वारकऱ्यांचे स्वप्न साकार झाले. आता पुन्हा विठ्ठल बडव्यांच्या ताब्यात देण्यासाठी मुंबई उच्च याचिका दाखल झाली आहे. या विरोधात सर्व तिर्थक्षेत्रातील वारकरी एकत्र झाले आहेत. सोमवारी आळंदी येथे झालेल्या बैठकीत विठ्ठल मंदिर पुन्हा बडव्यांच्या ताब्यात जाऊ देणार नाही, असा निर्धार वारकऱ्यांनी केला आहे.

        पंढरपूरचा पांडुरंग आता आहे त्याच व्यवस्थेत वारकऱ्यांचा रहावा यासाठी लढा उभारण्यासाठी आळंदी येथे फडकरी, दिंडीकरी, कीर्तनकार वारक-यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला कैकाडी महराज यांचे वंशज मठाधिपती भारत महराज जाधव, बापूसाहेब महराज टेंबूकर, बाळासाहेब महराज देहूकर, भागवत महराज जळगावकर, राजाभाऊ चोपदार, चैतन्य महराज कबीर, पाडुरंग महराज शितोळे, गोविंद महराज गोरे, सारंग महराज क्षीरसागर, तुकाराम महाराज घाडगे, रामेश्वर महराज शास्त्री, प्रकाश महराज जवंजाळ, नरहरी महराज चौधरी, दुशासन महराज क्षीरसागर, विकास महराज लवांडे, जालिंदर महाराज काळोखे, देवराम महराज कोठारे, सौरभ शिंदे आदी मान्यवर कीर्तनकार, दिंडीकरी, फडकरी उपस्थित होते. भारत महराज जाधव आणि भारत महराज घोगरे गुरुजी यांनी या बैठकीचे आयोजन केले होते.

        यावेळी फडकरी, दिंडीकरी समाजाच्या वतीने बोलताना भागवत महराज जळगावकर आणि बाळासाहेब महराज उखळीकर यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. याचिकेमध्ये सरकारला प्रतिवादी करण्यात आले असले तरी वारक-यांच्या वतीने आपण न्यायालयात जाणे गरजेचे आहे. ती तयारी केली असून दिडीकरी-फडक-यांच्या वतीने वकील देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. न्यालयीन लढाई बरोबरच रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागला तर तशी तयारी वारक-यांनी करावी, असे आवाहन शामसुंदर महराज सोन्नर यांनी केले. बैठकीचे प्रास्ताविक भारत महराज घोगरे गुरुजी यांनी केले.