आमदार दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते विठ्ठलवाडीत महापूजा संपन्न.

 

निरा नरसिंहपुर दिनांक: 30

प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,

इंदापूर तालुक्यामध्ये प्रसिद्ध तसेच‌ धाकटे पंढरपूर समजल्या जाणा-या श्री क्षेत्र विठ्ठलवाडी (रूई) येथे आषाढी एकादशी निमित्त आज आमदार दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते महापूजा संपन्न झाली.

श्री क्षेत्र विठ्ठलवाडी (रूई) देवस्थान हे इंदापूर तालुक्यामध्ये प्रसिद्ध असून या देवस्थानला धाकटे पंढरपूर समजले जात असल्याने आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविकांची मांदियाळी होती.

आमदार दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते विविधत महापूजा संपन्न झाली.यावेळी आमदार भरणे यांनी वारक-यांसमवेत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला तसेच ते विठूनामाच्या गजरात तल्लीन झाले होते.

विठूरायाच्या चरणी लीन होताना आमदार भरणे यांनी,इंदापूर तालुक्यातील माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या मेहनतीला यशाचा स्पर्श होऊन त्यांच्या जीवनात भरभराटी येऊ दे…!! तसेच शेत-शिवार हिरवाईने नटून बळीराच्या घरा-दारात सुकाळ नांदू दे..! व प्रत्येक राबत्या हाताला सुख- समृद्धी लाभू दे,असे साकडे घातले.