साकोली शहरात भरली पंढरपूरची यात्रा… — शहरात प्रथमच आषाढी एकादशी निमित्त भव्य स्वरूपात महाप्रसाद वितरण…

नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

        साकोली:आषाढी एकादशी निमित्त साकोली शहरात प्रथमच वारकऱ्यांसाठी विठ्ठल रुखमाई यांची पुजा अर्चना व भव्य महप्रसादाचा कार्यक्रम विठ्ठल नामाच्या गजरात साकोली येथील बँक ऑफ इंडिया समोर निसर्गरम्य वातावरणात असलेल्या संत शिरोमणी श्री नरहरी महाराज विठ्ठल रुखंमाई मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला वारकऱ्यांनी व भाविक भक्तांनी मोठ्या स्वरूपात हजेरी लावली होती.

 कार्यक्रमाचे दृश्य पाहून वाटायला लागले की, जणू पंढरपूरची यात्रा साकोली शहरात भरली.

      या महाप्रसादाच्या कार्यक्रमाला माजी आमदार बाळाभाऊ काशिवार,माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते,जी. प. सभापती मदन रामटेके,भाजपा तालुकाअध्यक्ष लखन बर्वे, काँगेस शहर अध्यक्ष दिलीप मासुरकर , सर्व माजी नगरसेवक,माजी नगरसेविका तसेच शहरातील व तालुक्यातील नामांकित व्यक्तींनी हजेरी लावून महाप्रसादाचा आस्वाद घेतला.

     या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतीय सोनार समाज शाखा साकोलीचे अध्यक्ष व्यंकटेश येवले,उपाध्यक्ष दिलीप निनावे,कार्याध्यक्ष राजेश ढोमणे,सचिव मयुर गजापुरे,कोषाध्यक्ष प्रकाश रोकडे, सहकार्यध्यक्ष अजय भजे,संयोजक किशोर पोगडे,सूत्रसंचालक सुरेश हर्षे, सहसचिव शैलेश ढोमणे, अशोक भरणे, सहकोषाध्यक्ष चंद्रशेखर पोगडे,सदाशिव मस्के,सहसंयोजक दिनेश गजापुरे,प्रसिध्दी प्रमुख हरिष पोगडे,संपर्क प्रमुख मोंटू गाजपुरे, प्रवक्ता अमेय डुंभरे,सांस्कृतिक प्रमुख अमोल हर्षे, मंडळाचे सदस्य भुषण भुजाडे,राजेंद्र हर्षे,गुणवंत गजापुरे,अरविंद डुंभरे, जनार्धन गजापुरे, ऋग्वेद येवले,मंगेश डुंभरे, रेवाराम गजापुरे, चंद्रहास भुजाडे, भाष्कर येवले, चुळाराम येवले,अरुण इन्कने,लेखीराम हर्षे, समस्त सदस्य तसेच संपूर्ण महिला कार्यकारिणी व सुवर्णसखी ग्रुपच्या सर्व महिलांनी अथक परिश्रम घेतले व उत्स्फूर्त पणे सहभाग दर्शविला.कार्यक्रमाची सांगता करतांना अध्यक्षांनी सांगितले की,गावकऱ्यांच्या व वारकऱ्यांचे उत्स्फूर्त सहभाग व प्रेम मिळाले त्यामुळे पुढच्या वर्षी हा कार्यक्रम याच्यापेक्ष्या भव्य स्वरूपात घेण्यात येईल.