एस टी महामंडळ च्या बस मध्ये बिघाड…

भाविक करमनकर 

धानोरा प्रतिनिधी

       दिनांक 29 आगस्ट ला सकाळी गडचिरोली वरून पाऊणे सात वाजता निघालेली बस धानोरा मुरुमगाव रोड वर जपतलाई इथे प्रेशर चढत नसल्यामुळे गाडी रोड उभी करावी लागल्याने प्रवाश्याना नाहक त्रास सहन करावा लागला आहे.

       सविस्तर वृत्त असे कि गडचिरोली ते सावरगाव गाडी क्रमांक एम एच ४० एन ८७२१ नंबर चि गाडी ही सकाळी पावणे सात वाजता गडचिरोली वरून सावरगाव साठी निघाली परंतू ती गाडी धानोरा मुरूम गाव रोड वर जपतलाई गावाजवळ प्रेशर चढत नसल्यामुळे गाडी रस्त्याच्या बाजूला उभी करण्याची नामुष्की ड्राइवर वर अली याचा त्रास प्रवाश्याना सोसावा लागत आहे. प्रवासी बस मध्ये ताटकळत बसून दुसऱ्या गाडीची वाट पाहत आहे.याच क्रमांकचि बस सोमवार ला सुद्धा एअर लॉक झाल्याने धानोरा येथे बंद पडली होती.  एस टी महामंडळ च्या गाड्या नेहमी रस्त्यावर बंद पडतात कधी बस छप्पर निघतात बस ड्राइवर ला छत्री घेऊन गाडी चालवावे लागतात असे चित्र आत्ता नेहमीच ऐकला मिळतात.

            एस टी महामंडळ ला प्रवास्यांच्या जीवाची अजिबात काळजी नाही प्रवाश्याच्या जीवाशी खेळणे सुरु आहे एस टी महामंडळ ने प्रवाश्याच्या जीवाशी खेळणे बंद करावे अन्यथा प्रवासी व नागरिक एस टी महामंडळ च्या विरुद्धत रस्त्यावर उतरेल अशी वेळ एस टी महामंडळ नी येऊ देऊ नये प्रवाश्याना चांगले बसेस उपलब्ध करून सेवा द्यावी अशी नागरिकचि मागणी आहे.