दिक्षा कऱ्हाडे
वृत्त संपादीका
अनेक रुग्णांना जिवदान देण्यासाठी रक्ताची गरज भासत असते.रक्त पेढीमध्ये रक्तदानातंर्गत रक्त जमा असल्यास गरजू रुग्णांना वेळेवर रक्ताचा पुरवठा करण्यात येतो व आवश्यक गंभीर रुग्णांना रक्तदानाच्या माध्यमातून वाचविले जातय.
याच उदात्त हेतूने जिवन ज्योति ब्लड सेंटर नागपूर यांच्या सहकार्यातंर्गत पोलीस स्टेशन भिसीच्या माध्यमातून,पोलीस स्टेशन भिसी येथे रक्तदान शिबिराचे आज आयोजन करण्यात आले असून रक्तदान दाते रक्तदान करण्यास पुढे सरसावले आहेत.
सदर रक्तदान शिबीराला आज १० वाजता प्रारंभ झाला असून सायंकाळी चार वाजता पर्यंत शिबीर सुरु असणार आहे.
पोलीस अधिक्षक चंद्रपूर,उपविभागिय पोलीस अधिकारी चिमूर यांच्या मार्गदर्शनाखाली भिसी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रमोद राऊत,उपनिरीक्षक सचिन जंगम,जांभुळघाट बिट जमादार अमोल नवघरे यांच्यासह सर्व पोलिस वृंद रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी संवेदनशील कर्तव्यातंर्गत कर्तव्य पार पाडीत आहेत.
पोलीस स्टेशन भिसी यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आज करण्यात आलेले आयोजन स्तुत्य उपक्रमाचे अंग असून संवेदनशील मनाचे भरीव योगदान आहे व कुशल कर्तव्याचे उत्तम कर्म आहे.