अ मॉडेल्स ड्रिम तर्फे मिस्टर मिस अँड मिसेस महाराष्ट्र २०२३ च्या विजेता गितांजली थूटे… — चिमूर क्रांती नगरीत त्यांचे विविध स्तरावरून अभिनंदन! — चिमूर क्रांती भूमीच्या लेकीचा लौकिक उज्वल भविष्यासाठी महत्वपूर्ण…

 

दिक्षा कऱ्हाडे 

वृत्त संपादीका 

चिमूर : – 

        चिमूर शहरामध्ये १७ ऑगस्ट २०२३ रोजी मंगळवारला हॉटेल सफारी चिमूर येथे मिस्टर मिस अँड मिसेस महाराष्ट्र २०२३ च्या इच्छुक कलाकारांच्या चाचणीची वेळ हि दुपारी १२ वाजेपासून ते ५ वाजेपर्यंत ची ठरविण्यात आली होती. 

             याचे आयोजक संस्थापक संचालक मिस्टर अजिंक्य दाबेराव मिस्टर इंडिया २०१९ चे विजेते यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 

           सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सईश वारजूकर ( सरपंच शंकरपूर ग्राम पंचायत ) तसेच ईतर पाहुण्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणावर हजेरी होती.

          या कार्यक्रमात गितांजली योगेश थुटे यांच्या मुलीने सहभाग घेतला होता.

         आयोजक व प्रमुख पाहुण्यांच्या आग्रहाने कुठलाही सराव न करता त्यामध्ये सहभागी होणे आणि त्यात यश प्राप्त करणे हे भाग्यच म्हणावे’ यामध्ये निवड करण्यात आलेल्या मिस्टर मिस अँड मिसेस ची प्रथम सत्रानंतर पुढील अंतिम चाचणी हि नागपूर येथील हॉटेल ओरिएन्ट तायबा येथे दहा दिवसांनी २६ ऑगस्ट २०२३ ला सायंकाळी ६ वाजता घेण्यात आली.

          यामध्ये महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून स्पर्धक आलेले होते.या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सईश वारजूकर ( सरपंच शंकरपूर ग्राम पंचायत ) , डॉ.विजय कुमार चौबे , सौ.निशी चौबे , सौ.अश्विनी खोब्रागडे तसेच ईतर पाहुण्यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाची सुरुवात झाली.

            अ मॉडेल्स ड्रिम प्रस्तुत मिस्टर,मिस अँन्ड मिसेस महाराष्ट्रा आयकॉन २०२३ या राज्य स्तरीय स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये चिमूर येथील गितांजली योगेश थुटे यांनी दोन प्रतिस्पर्धीना मागे टाकत मिसेस महाराष्ट्र २०२३ च्या त्या विजेत्या ठरल्या.

            त्यांच्या या उल्लेखनिय कामगिरीने नावलौकिक क्रांती नगरीच्या शिरपेचात रत्नजळीत मुकुट लागल्याने विविध स्तरावरून त्यांचे व त्यांच्या मुलीचे कौतुक केले जात आहे.

            तद्वतच चिमूर क्रांती भुमितल्या लेकिला सदर स्पर्धा अंतर्गत प्रथम सन्मान मिळाल्याने कौतुकास्पद विजेते पद ठरले आहे.