Home Maharashtra ट्रकचा साफ्ट तुटून अपघात,अपघातात ड्रायव्हर-क्लीनर जखमी.. 

ट्रकचा साफ्ट तुटून अपघात,अपघातात ड्रायव्हर-क्लीनर जखमी.. 

 भाविक करमनकर 

तालुका प्रतिनिधी धानोरा

       मुरुमगाव जवळ बेलगाव येथे मुख्य महामार्गावर अचानक साफ्ट तुटल्याने ट्रक चा अपघात झाला.या अपघातात ट्रक ड्रायव्हर-क्लीनर जखमी झाले आहेत.

          ट्रक क्रमांक UP-71,AT-5619 या क्रमांका चा असून गाडी गडचिरोली वरून छत्तीसगढ राज्य येथे जात होती.मुरुमगाव ग्रामपंचायत अतंर्गत मौजा बेलगाव येथे आज दिनांक 13 मे 2024 ला ठिक दूपारी 3:00 वाजता साफ्ट तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला.

          यात चालक गंभीर स्वरूपात जखमी झाला असून चालकाचे पाय तूटले आहे व क्लीनर ला किरकोळ इजा असून त्यांना लगेच ग्रामिण रुग्णालय धानोरा यथे रेफर करण्यात आले आहे.

          ड्रायव्हरचे नाव सोहेल मोहम्मद अन्सारी,क्लिनर गुपरान मोहम्मद अन्सारी दोघेही उत्तर प्रदेश आंबेडकर नगरचे आहेत.

      गाडी मुंबई येथील किस्मत खान यांची असल्याचे समजते.