शिक्षकांचा विविध मागण्यांसाठी चिखलदरा पंचायत समितीवर ठिय्या आंदोलन .! — प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांच्या नेतृत्व : शेकडो शिक्षकांची उपस्थिती..

 

दखल न्युज भारत

चिखलदरा तालुका 

प्रतिनिधी अबोदनगो चव्हाण

मो.न.7588228688

चिखलदरा: 

 

      चिखलदरा पंचायत समिती अंतर्गत शिक्षकांच्या बऱ्याच मागण्या असून अनेक प्रश्न रखडलेले आहेत.या संदर्भात शिक्षकांनी चिखलदरा पंचायत समिती तसेच गटविकास अधिकारी,गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदन तथा मागण्या करूनही शिक्षकांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत व एका महिन्याचा पगार सुद्धा झाला नाही.

       यामुळे शिक्षकांनी अखेर आंदोलनाचा हत्यार उपसले,त्या संदर्भात आज शिक्षकांनी चिखलदरा पंचायत समितीवर ठिय्या आंदोलन केले व चिखलदरा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रामेश्वर माळवे यांच्या मध्यस्थीने शिक्षकांनी आंदोलन मागे घेतले.

          शिक्षण विभागाकडून आज सायंकाळपर्यंत एक महिन्याचा पगार जमा होईल असे आश्वासन मिळाल्यानंतर शिक्षकांनी ठिय्या आंदोलन संपुष्टात आणले.

         हे आंदोलन प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे,यांच्या नेतृत्वात करण्यात आले.शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या असून त्या मार्गी लावण्यासाठी आंदोलन करण्यात आले.

         या मागण्या मध्ये पंचायत चिखलदरा अंतर्गत सन २०२२ मध्ये आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेल्या शिक्षकांचे वेतन काढून थकबाकी अदा करण्यात यावी.शिक्षकांचे वेतन दरमहा एक तारखेला करणे.दरमहा शिक्षकांच्या वेतनातून होणाऱ्या सर्व प्रकारच्या कपाती त्यांच्या वेतनातून केल्यावर सुद्धा कपाती संबंधित कार्यालय,बँक येथे अप्राप्त आहेत. 

        करिता वेतन आणि कपाती सोबतच पाठविण्यात यावे.चिखलदरा पंचायत समिती अंतर्गत प्रलंबित वैद्यकीयप्रतिपूर्ती देयके तात्काळ निकाली काढण्याबाबत कार्यवाही करावी. शिक्षकांच्या दरमहा LIC कपाती दरमहा वेतनातून करण्यात आल्या परंतु माहे फेब्रुवारी २०२३ पासून संबंधित कार्यालयास अप्राप्त आहेत,करिता तात्काळ जमा करण्यात यावी.

        शिक्षकांचा वेतनातून दरमहा कपात केलेला आयकर भरण्यात यावा.जिल्हाअंतर्गत बदलीने चिखलदरा पंचायत समिती मधून इतर पंचायत समिती मध्ये बदली झालेल्या शिक्षकांचे सेवापुस्तक परिपूर्ण नोंदी घेऊन संबंधित कार्यालयास पाठविण्यात यावे.

       जिल्हांतर्गत बदलीने इतर पंचायत समिती मधून चिखलदरा पं.स. मध्ये रुजू झालेल्या शिक्षकांच्या रुजू तसेच आवश्यक नोंदी मूळ सेवापुस्तकात घेण्यास संबंधितास आदेशीत करावे.ज्या शिक्षकांची जुलै २०२२, जुलै २०२३ वेतन वाढ रक्कम अद्याप पर्यंत जमा झालेली नाही,त्यांची वेतन वाढीची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी.या मागण्यांचा समावेश होता.

      यावेळी महेश ठाकरे यांच्या नेतृत्वात सरचिटणीस अमोल वऱ्हेकर ,जिल्हा संघटक दिलीप इंगळे,जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम सांगळे,शिक्षक समिती तालुका सचिव प्रमोद ढाकुलकर 

ज्ञानेश्वर सावरकर,केंद्र प्रमुख विनोद वानखडे,शिक्षक परिषद चे युवराज अढाऊ, गजानन बोरोळे,आदिवासी शिक्षक संघटनेचे मनीराम कासदेकर,  

शिक्षक संघ सचिव शेख जावेद,संजय बेठे, रामदास सावलकर ,गोपालकृष्ण पारे

,राम चौधरी,छन्नू जामुणकर,डी.वी.डहाके,कृष्णकुमार दारसिंबे,सी.एम .जामकर,एस.आर.बेठे,के.जी.झाडे, एस .आर .झाडे,के .जी .झाडे, एस एस महल्ले,व्ही.एल. भिलावेकर,एस ओ बेठेकर,बी.एम.कासदेकर ,के.ए. निर्माळे,जी.झेड.तोटे,राजेंद्र जवंजाळ

,मनोज बेठे,गोवर्धन गुट्टे,पी. एस .मावस्कर ,सुनंदा मोरे,आर.जी. बेटले, किशोर साखरकर,बेलसरे सर आदी शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आंदोलन दरम्यान जिल्हा परिषदेचे माजी सभापती दयारामजी काळे यांनी आंदोलन करता शिक्षकांची भेट घेतली व समस्या जाणून घेतल्या.