ग्रामपंचायत कर्मचारी संघटना तालुका धानोरा(४५११) ची कार्यकारणी गठित…

 

भाविक करमनकर 

धानोरा प्रतिनिधी

        दिनांक 27 आगस्ट 2023 रोज रविवारला ठीक बारा वाजता ग्रामपंचायत सालेभट्टी सभागृह याठिकाणी ग्रामपंचायत कर्मचारी संघटना रजिस्ट्रेशन नं ४५११, तालुका धानोराची सभा मारुतीची फुलेवार जिल्हा अध्यक्ष गडचिरोली ,यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली.

        या सभेला शालिकराव पदा जिल्हा उपाध्यक्ष गडचिरोली उपस्थित होते.यावेळी धानोरा तालुक्याची ग्रामपंचायत कर्मचारी संघटना ४५११ नवीन कार्यकारणी गठित करण्यात आली. तसेच अनेक विषयावर चर्चा करण्यात आले.

          या सभेला एकूण 54 कर्मचारी उपस्थित असून नवीन कार्यकरणीचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर जी शेंडे, उपाध्यक्ष गुरुदासजी, व तालुका सचिव उमेश कुमार तुलावी ,सहसचिव मनीराम गावडे ,व संघटक नितीन वासेकर ,कार्याध्यक्ष नामदेव बेस्ट, व सदस्य पंकज गेडाम व इतर एकूण 54 कर्मचारी उपस्थित होते यावेळी कर्मचाऱ्यांची संघटनेतर्फे समस्या जाणून घेतले व कर्मचाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.

         या कार्यक्रमाचे संचालन उमेश तुलावी यांनी केले तर आभार प्रदर्शन पंकज यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुधीर पद्दा, लोशन मडावी,ज्योती मडावी,प्रिय दुग्गा,ब्रिजलाल मडावी, शेषराव नैताम,सुखदेव हलामी,अमित सिंपी शंकर एक्का पार्वती गडपयाले, व तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी सहकार्य केले.