वृत्तसेवा…
Madras High Court corruption judges comment: याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठाने स्पष्ट शब्दांत सांगितले की,”न्यायव्यवस्थेत भ्रष्टाचार आहे,हे नाकारता येणार नाही.
भूतकाळातही भ्रष्ट न्यायाधीश होते आणि आजही आहेत.”
Madras High Court corruption judges comment Tamil movie Karuppu | Corruption in judiciary Madras High Court decision | मद्रास उच्च न्यायालय न्यायव्यवस्थेत भ्रष्टाचार टिप्पणी | करुप्पू तमिळ चित्रपट कोर्ट निकाल…
चेन्नई:- “न्यायव्यवस्थेत भ्रष्टाचार अस्तित्वात आहे आणि या वास्तवापासून कोणीही पाठ फिरवू शकत नाही.त्यामुळे न्यायमूर्तींना कोणीगायींसारखं पवित्र समजण्याची गरज नाही,” अशी टिप्पणी मद्रास उच्च न्यायालयाने केली आहे.
एका तमिळ चित्रपटावरील बंदीची मागणी फेटाळताना न्यायालयाने हे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले.कनिष्ठ न्यायालयातील भ्रष्टाचारावर भाष्य करणाऱ्या ‘करुप्पू’ (Karuppu) या तमिळ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका मद्रास उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
न्यायमूर्ती जी.आर.स्वामिनाथन आणि न्यायमूर्ती व्ही.लक्ष्मीनारायणन यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.


