दखणे विद्यालयाचे सुयश, एसएससी परीक्षेचा निकाल ९१%…

 भाविक करमनकर 

तालुका प्रतिनिधी धानोरा 

       धानोरा तालुक्यातील मुरुमगाव येथील के.आर.दखणे आदिवासी विकास शिक्षण संस्था मुरूमगाव, द्वारा संचालित स्व.रामचंद्रजी दखणे विद्यालयाचा एसएससी परीक्षेचा निकाल 91 टक्के लागला आहे.

           परीक्षेला प्रविष्ट एकूण 23 विद्यार्थ्यापैकी 21 विद्यार्थी उत्तीर्ण झाले ,त्यात प्रथम श्रेणीत 13 विद्यार्थी, दिवतिया श्रेणीत 7 विद्यार्थी,तृतीय श्रेणीत एक विद्यार्थी उत्तीर्ण झाला.

           प्रथम श्रेणीत आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये कुमारी दिक्षा मदनलाल मलिया हिने 85% गुण मिळवत शाळेतून अव्वल स्थान पटकाविले ,कुमारी सलेहा नईम शेख 83% गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक पटकावला,कुमारी मीनाक्षी तुलाराम भैसारा ८२% गुण प्राप्त झाले असून ती तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली.

          प्रथम श्रेणीत आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये ओम एस. बघेल 81 टक्के ,कुमारी शालिनी. एस .भोयर 81 टक्के ,मोहम्मद मुज्जमिल मोहम्मद शरीफ कुरेशी 77%, कुमारी रानी पाऊल बुरेवार 75 टक्के, कुमारी कल्पना सी देहरी 73 % राजकुमार .एफ. फाफामारिया 64% ,कुमारी चांदनी जी मडावी 62%, रुपेश झेड नैताम 61%,प्रियंका एस झोका 60% नरेंद्र .एन. नैताम 60% असे एकूण 13 विद्यार्थी प्रथम श्रेणी उत्तीर्ण झाले. 

           यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष कमलाबाई दखणे संस्था सचिव महेंद्रजी दखणे कोषाध्यक्ष करीमाताई देवानी ,संस्था सदस्य रेखाताई मेशकर, जिजाताई कवाडकर, मंगलाताई उईके, हरिरमजी कावाडकर, कृपारामजी भूर्कुरिया,मुख्याध्यापक महेंद्र जांभुळकर यांनी अभिनंदन केले.

  यशस्वी विद्यार्थ्यांनी त्यांच्या यशाची श्रेय वर्गशिक्षक बाळकृष्ण बोरकर, भास्कर मेश्राम ,घनश्याम चिंचोलकर सतीश सुरणकर ,संतोष देशमुख ,विलास चौधरी ,रमेश निसार , रामाधर राणा, सुरेश तुलावी आदींना दिले आहे.