अनुष्का भोयर, प्रियदर्शनी विद्यालयातुन प्रथम…

भाविक करमनकर

धानोरा तालुका प्रतिनिधी

धानोरा शहरातील प्रियदर्शनी विद्यालयातुन अनुष्का भोयर हि विद्यार्थ्यांनी ने 78 टक्के गुण घेऊन विद्यालयातुन प्रथम येण्याचा मान मिळवित विद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत शाळेचा निकाल 98.71 टक्के लागला आहे. 

        प्रियदर्शनी विद्यालयातुन अनुष्का भास्कर भोयर ह्या विद्यार्थिनींनी शाळेतून प्रथम आली.तिला 500पैकी392गुण मिळवित गुणांची टक्केवारी 78.33टक्के येवढी आहे.

         द्वितिय क्रमांकावर नकुल बालाजी राजगडे याने 500 पैकी 385गुण मिळवित गुणांची टक्केवारी 77.00 आहे.तृतियस्थानि युग कुमोद मशाखेत्री 500 पैकी 384 76.80%,कु . रोहिणी गणेश मांदळे हिने 500पैकी 378 गुण मिळवित 75.60%प्राप्त केले आहेत.

          त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री लोखंडे, शिक्षिका सौ. गुरुमुले, सौ. राऊत, श्री रामटेके व श्री घोटेकर उपस्थित होते.

            गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थ्यांचे पालक भास्कर भोयरसह आदिचे पुष्पगुच्छ व रोख पुरस्काराने सन्मानित करून विद्यार्थ्यांना व पालकांना शुभेच्छा दिल्या. त्यामुळे शाळेचे सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदन केले जात आहे.