माध्यमिक विद्यालय कान्होलीने राखली यशाची परंपरा. 

युवराज डोंगरे

   उपसंपादक 

      खल्लार श्री संत गाडगेबाबा शिक्षण संस्था नालवाडा द्वारा संचालित असलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कान्होली येथिल विद्यालयाचा निकाल ९२ टक्के टक्के लागला आहे.

         यावर्षी बोर्डाच्या परीक्षेसाठी विद्यालयातील एकूण २६ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते त्यापैकी ६ विद्यार्थी प्राविण्य प्राप्त ,६ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये आणि ९ विद्यार्थी द्वितीय श्रेणी मध्ये पास झालेले आहे.

         यामध्ये कु. ऋतुजा विठ्ठल नांदणे या विद्यार्थिनीने विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांक कु.तृप्ती राजेंद्र वानखडे हिने मिळविला तर आचल संतोष खंडारे हिने तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे.

           यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सर्व पदाधिकारी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले आहे.