मिलिंद विद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम… 

युवराज डोंगरे

  उपसंपादक 

खल्लार येथून जवळच असलेल्या गौरखेडा (चांदई )येथील राहुल व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती द्वारा संचालित मिलिंद विद्यालयाने यावर्षीही उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली. इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून शाळेतून परीक्षेला बसलेले सर्व विद्यार्थी पास झाले आहे. त्यापैकी विशेष प्राविण्य प्राप्त ११ विद्यार्थी असून प्रथम श्रेणीमध्ये १२ विद्यार्थी व द्वितीय श्रेणी मध्ये २ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

           कु.ईश्वरी दिपक सोळंके या विद्यार्थिनीने विद्यालयातून प्रथम येण्याचा मान पटकावला. कु. करिष्मा एकनाथ डाहे हिने दुसरा क्रमांक मिळवला तर कु. तनवी प्रदीप खंडारे हिने तिसरा क्रमांक पटकावला. 

          सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाज भूषण मधुकरराव अभ्यंकर, संस्थेचे अध्यक्ष क्षितिज अभ्यंकर तसेच संचालिका शुभांगी अभ्यंकर, सचिव गजानन वानखडे, सहसचिव सतीश फुंडकर व सर्व कार्यकरिणी सुधाकरराव धुरंधर विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षाकेतर कर्मचारी यांनी स्वागत केले आहे.