सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीकरिता पी.आर.पी.शिवसेना (शिंदे गटा) सोबत चरणदास इंगोले…

युवराज डोंगरे/खल्लार 

         उपसंपादक

           केवळ राजकीय फायद्यासाठी नव्हे तर सामाजिक हित लक्षात घेऊन आणि राज्याच्या विकासासाठी माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिकन पार्टीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेसोबत राजकीय युती केलेली आहे.

           भिमशक्ती व शिवशक्तीच्या रूपाने या युतीला अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील राहावे असे आवाहन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास इंगोले यांनी दर्यापूर येथे कार्यकर्त्यांच्या बैठकी प्रसंगी बोलताना केले.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती विषयक राजकीय धोरण कार्यकर्त्यांच्या पर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने 29 फेब्रुवारीला विश्रामगृह दर्यापूर येथे तालुक्यातील कार्यकर्त्यांची चरणदास इंगोले यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रमुख बैठक घेण्यात आली.

          मुख्यमंत्री एकनाथ।शिंदे यांच्या शिवसेनेसोबत राजकीय युती असली तरी पर्यायाने आपला पक्ष महायुतीतील घटक पक्ष म्हणून लोकसभा निवडणुकीत काम करणार आहे. तेव्हा दर्यापूर तालुक्यातील पक्ष कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या आणि त्याचबरोबर महायुतीतील घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संपर्कात राहून समन्वय ठेवावा अशा सूचनाही चरणदास इंगोले यांनी कार्यकर्त्यांच्या तालुकास्तरीय बैठकीला मार्गदर्शन करताना केल्या आहे.

          बैठकीला तालुका अध्यक्ष व पंचायत समिती माजी सभापती रामेश्वर इंगळे, तालुका उपाध्यक्ष मुकुंदराव ढोके, बाबुराव थोरात, दिपक आठवले, गणेश वाकपांजर, बाबाराव वानखडे, बलदेव थोरात, विजय जामनिक, प्रविण रुपनारायण, भास्कर रोकडे, सह अन्य कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते.