लोंढोली येथील जि.प.शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा…

     सुधाकर दुधे

सावली तालुका प्रतिनिधि 

             रोज बुधवारला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लोढोली येथे राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून अपूर्व विज्ञान मेळावा आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय श्री. उष्टू पेंदोर सरपंच ग्रामपंचायत लोंढोली हे होते. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी मु.अ.घनश्याम शिंदे सर हे होते.

          शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध प्रयोग बनवले विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व्हावा त्यांच्या विज्ञान वृत्तीचा विकास व्हावा त्यांना विज्ञानाचे महत्त्व दैनंदिन जीवनात कसे होते यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते .

           कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेतील विज्ञान शिक्षक श्री अविनाश नागनाथ घोनमोडे यांनी केले आपल्या देशात होऊन गेलेल्या विविध शास्त्रज्ञ यांच्या विषयी सखोल अशी माहिती दिली.

          विविध शास्त्रज्ञांचे शोधाचे महत्त्व स्पष्ट केले राष्ट्रीय विज्ञान दिन का साजरा केला जातो डॉक्टर सी व्ही रमण यांच्या रामन इफेक्ट या संशोधनाबद्दल त्यांना भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाला त्यांच्या या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो. असे स्पष्ट केले.

         त्याचप्रमाणे शाळेतील शिक्षिका कुमारी मंजू भोयर आपल्या दैनंदिन जीवनात सकाळपासून तर संध्याकाळ पर्यंत विज्ञान कसे काम करते याचे महत्त्व विशद केले.

         त्याचप्रमाणे प्रमुख मार्गदर्शक श्री शिंदे सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले त्याचप्रमाणे सी व्ही रमण यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.कार्यक्रमाचे उद्घाटक उष्टुजी पेंदोर सरपंच लोंढोली यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांच्यात असलेले कुतूहल या प्रयोगातून सिद्ध करावे व भविष्यात एक चांगला शास्त्रज्ञ होऊन देशाचे नाव उज्वल करावे.समाजात असलेली अंधश्रद्धा यावर विज्ञानाने कशी मात केली याविषयी सुद्धा मार्गदर्शन केले.

           कार्यक्रमाचे संचालन शाळेतील शिक्षक धानोरकर सर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन मूलकलवार मॅडम यांनी केले. परीक्षक म्हणून सिद्धार्थ हायस्कूल लोंढोली येथील विज्ञान शिक्षक रमेश बुधे सर यांनी केले. चुनारकर सर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा साखरी यांनी अचानक भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक करून मनोबल वाढविले.

शेवटी विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. विज्ञान दिनानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धासुद्धा घेण्यात आली यामध्ये 15 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अशा पद्धतीने राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला.