पारशिवनीच्या तहसिलदारांची रेती चोरांवर धडक कारवाई.. — तिनं ट्रक जप्त.. — ७ लाख ३१ हजार रुपयांचा दंड.

     कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी : – 

       तालुका तहसिल कार्यालयचे नवनियुक्त तहसिलदार श्री.राजेश भंडारकर यांनी पदभार ग्रहण केल्या नंतर प्रथमतःच रविवार सकाळी कन्हान ते गऊहिवरा रोड जवळ पेट्रोलिंग करित असताना गुप्त माहिती अंतर्गत विशेष पथकच्या सहकार्याने नाकाबंदी अन्वये विना परवाना अवैधरित्या चोरीची रेती वाहतुक करताना तीन ट्रक पकडले.

            सदर तिनं ट्रकमध्ये एकूण २१ ब्रॉस रेती असल्याचे आढळून आले असल्याने त्यांच्यावर एकुण ०७ लाख ३१ हजार ४०० रूपयाची रेती जप्त करून महसुल खनिज मॅगनिज अधिनियम अंतर्गत दंडात्मक व इतर कारवाई केली. 

***

दंडात्मक कारवाई…

       १) क्रमाक एम.एच.४०,३३६६ टूक मध्ये ८ ब्रास अवैध रेती महसुल दंड २ लाख ४९ हजार ९२० रुपये.

          २) एम.एच ४०,सि.एम.६८४५ मध्ये ५ ब्रास रेती महसुल विभागाचा दंड ०२ लाख ३१ हजार २०० रुपये.

        ३) एम.एच.४०,सि.एम. ३५२७ मध्ये ८ ब्रास रेती त्यावर दंड ०२ लाख ४९ हजार ९२० रूपये दंड अकारण्यात आले.

              तहासिलदार राजेश भंडारकर यांनी महसुल गौण खनिज अधिनियम अंतर्गत २१ ब्रास रेतीला अनुसरून एकुण ०७ लाख ३२ हजार ४०० रुपयेचा दंड ठोठावला.

           तहसिलदार राजेश भंडारकर यांचे उपस्थितीत महसूल पथकातील मंडल अधिकारी,तलाठी,कोतवाल यांनी रेती व ट्रक जप्तीची यशस्वी कार्यवाही करून पंचनामा केला व यानंतर तिन्ही ट्रक कन्हान पोलिस स्टेशनला जमा करण्यात आले.