राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(अजीत पवार) द्वारा भिसी येथील मुख्याधिकाऱ्यांना दिले आज निवेदन… — भिसी येथील वार्ड क्रमांक ३ अंतर्गत समस्याग्रस्त नागरिकांसह जिल्हा महासचिव अरविंद रेवतकर यांनी,विविध समस्या बाबत मुख्याधिकारी यांच्यासोबत केली सविस्तर चर्चा..

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

         वृत्त संपादीका 

             भिसी येथील नागरिक अनेक समस्यांनी ग्रस्त झाले असून त्यांचा समस्यांकडे समाजसेवक तथा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे जिल्हा महासचिव अरविंद रेवतकर यांनी आर्वजून लक्ष घ्यायचे ठरवीले आहे व भिसी येथील नागरिकांच्या आवश्यक समस्या दूर केल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही असा चंग त्यांनी बांधलेला आहे.

           समस्या निवारणाचा एक भाग म्हणून भिसी येथील समस्याग्रस्त नागरिकांसह,”भिसी नगर पंचायतच्या मुख्याधिकारी राठोड मॅडम यांना,राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे चंद्रपूर जिल्हा महासचिव अरविंद रेवतकर,चिमूर विधानसभेच्या महिला आघाडी अध्यक्षा सौ.अविशाताई रोकडे यांच्या नेतृत्वात विविध समस्यांचे निवेदन आज देण्यात आले व भिसी वासीयांच्या समस्या तात्काळ निकाली काढण्यासंबंधाने मुख्याधिकारी राठोड यांच्या सोबत शिष्टमंडळाने सविस्तर चर्चा केली.

**

मुख्य मागणी…

           वार्ड क्रमांक ३ मध्ये व इतर वार्डामध्ये,”मागील ६० ते ७० वर्षापासून आबादी जागेंवर कच्चे व पक्के मकान बांधून राहात असलेल्या भिसी वासीयांना,त्यांची रहिवासी वहिवाट घरगुती जागा नियमानुकुल करून त्यांना कायमस्वरूपी मालकी हक्क पट्टे देणे हे निवेदनातंर्गत मुख्य मागणी आहे..

***

इतर मागण्या…

       १) नवीन नळ कनेक्शन जोडणी करणे व आवश्यक नागरिकांना नळ कनेक्शन देणे,२) विद्युत खांबावर लाईट लागणे,३) तुटलेल्या मौवऱ्यांचे(नाल्यावरील छोट्या गाव पुलांचे व इतर) पुनर्र बांधकाम करणे,४) नाल्या बांधकाम व रस्त्याचे बांधकाम करुण देणे,या इतर मागण्यांचा सुद्धा निवेदनात समावेश आहे.

**

निवेदन देताना उपस्थित समस्याग्रस्त नागरिक व महिला भगिनीं…

         निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चंद्रपूर जिल्हा महासचिव अरविंद रेवतकर,चिमूर विधानसभा महिला आघाडी अध्यक्षा सौ. अविशाताई रोकडे,समाजसेवक तथा प्रशिध्द पेंटर जगत,विजय नवले,अक्षय नागपूरे,अक्षय खवसे,देवीदास घुटके,सुनील तांबे,चेतन पडोळे,पंकज रेवतकर,शैलेश आजवनकर,शैलेश बावणे व इतर महिला भगिनीं,पुरुष बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.