साकोलीत अतिक्रमण करा व चक्क जागा विका..! — नरपरिषदेकडे अशे किती आहेत नोंदी; स्थानिक मुळ निवासींना शहरात जागाच नाही…

      ऋग्वेद येवले 

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

        दखल न्यूज भारत 

       साकोली : शिर्षक वाचून अचंबित झालेत.? पण हे या साकोलीत होऊ शकते. शहरात आज अतोनात शासकीय भूखंडावर अतिक्रमणे फोफावली असता त्यातून बाहेरील लोकांनी किती शासकीय जागा विकून साकोली सोडून पळाले.? याची स्थानिक नगरपरिषदेकडे आतापर्यंत ही नोंद आहे काय..? यात नगरपरिषदेचे विकण्यात कोण कोण सामिल आहेत.? की किती जणांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून ती जागा परस्पर साध्या नोटरीने विकली गेली.? आणि दूसरीकडे आजही मुळ साकोली निवासी युवा बेरोजगारांकडे साधा व्यवसाय सुरू करायला जागा उपलब्ध नाही असा संतापजनक सुर स्थानिक युवा जनतेत निघत आहे. 

         आज शहरात ही स्थिती आहे की, मुळ शहरातील अनेक युवा बेरोजगारांकडे व्यवसाय करायलाच जागा उरली नाही. जागोजागी अतिक्रमण करून चुना आखण्याच्या योजनेत बाहेरील व्यक्ती येत चक्क अतिक्रमणे करतात काही दिवसांनी तेथे तयार शेडसह ती जागाच विकतात. असा प्रकार सेंदूरवाफा श्रीनगर कॉलनीतील भरपूर जागी झाला आहे पण आतापर्यंत उघडकीस आलेला नाही. शासकीय भूखंडावरील जागा ही नियमाने विकता येते का.? त्याची शासकीय विक्री निबंधक येथून होते का.? तर याचे उत्तर नाही. पण येथील काहींनी बाहेरील व्यक्तींकडून शासकीय जागा ७० हजार, १ लाख, दिड लाख व दोन दोन लाखांत अतिक्रमणे करून शासकीय जागाच विकल्याचा महाप्रतापी कारनामा येथे घडलेला आहे व आताही घडत आहे.

         पण याने शहरातील मुळ निवासी युवा बेरोजगारांकडे साधा व्यवसाय सुरू करण्यासाठी आज जागा नाही, सुरू करायला गेले तर काही मुजोर व बाहेरील व्यक्ती अडंगा टाकतात मग स्थानिक युवकांनी करावे काय‌.? असा संतापजनक प्रश्न आज युवा जनता करीत आहेत. यांचे जिवंत उदाहरण तलाव पाळीजवळील अतिक्रमण लोकांनी येथील टिन शेडसह बसण्याची जागा ६० ते ७० हजारांमध्ये विकल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणात नगरपरिषदेच्या अधिका-यांनी जेथे जेथे शासकीय भूखंडावर अतिक्रमणे आहेत तेथे जाऊन मोका चौकशी केली काय.? किती लोकांनी शासकीय जागा विकून किती लोक साकोली सेंदूरवाफा सोडून अन्यत्र पळून गेले.? याची सविस्तर नगरपरिषद रेकॉर्डला नोंद झाली आहे काय.? हे सर्व सत्य समोर येणे गरजेचे झाले आहे. 

            मागे नागझिरा रोड व लाखांदूर रोड गोवर्धन चौक येथील अतिक्रमणे नगरपरिषदेने हटविली त्यात ७५% टक्के मुळ स्थानिक निवासी होते अश्या युवा बेरोजगारांना दूसरीकडे जागा उपलब्ध झाली काय.? शोधायाला गेले तर अगोदर पासूनच बाहेरील अतिक्रमणधारकांनी चूना पोतून कब्जा जमवून ठेवला. मग साकोली सेंदूरवाफा शहरातील मुळ निवासींनी करायचे काय.? एकीकडे शासकीय भूखंडावरील जागा विकून बाहेरील स्थानिकांना हाताशी धरून असा ४२० गोरखधंदा राजरोसपणे सुरू आहे आणि दुसरीकडे स्थानिक मुळ निवासींना शहरात साधा व्यवसाय सुरू करण्यासाठी आज जागा नाही. आता मात्र या शहरातील संतापजनक प्रकारात स्थानिक निवासी आंदोलन छेडल्याशिवाय युवा बेरोजगारांना न्याय हक्कासाठी जागा मिळणार नाही असा सवाल आज प्रत्येक मुळ निवासी जनता करीत आहेत.