उकारा ग्रामवासीयांनी दिला पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा… — प्रकरण बनावट दस्तऐवज करून शासकीय जमिनीवर अतिक्रमणाचे निवेदन पत्रात सरपंच उपसरपंचांसह तंटामुक्त समितींच्या सह्या…

    ऋग्वेद येवले

नागपूर विभागीय प्रतिनिधी

       साकोली : मौजा उकारा येथे गट क्र. २६३/१ आराजी ०.६५ हे. आर. क्षेत्रावरील अतिक्रमण हटविण्याबाबद मागे ७ ऑगस्टला ग्रामवासी साकोली वनविभागावर धडकले होते. याबाबद जिल्हाधिकारी महसूल यांनी उपवनसंरक्षक भंडारा यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेशही देऊन कोणतीही कारवाई होत नाही यामुळे पुन्हा १९ ऑक्टों.ला उकारा ग्रामपंचायत व ग्रामवासीयांनी यावर १५ दिवसात कारवाई न झाल्यास बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा स्वाक्षऱ्यांसह पत्रातून दिला आहे. 

        प्रकरण असे की, मौजा उकारा, ता. साकोली येथील गट क्र. २६३/१ आराजी ०.६५ हे. आर. क्षेत्रावरील अवैद्य व बनावट दस्ताऐवज तयार करून आनाधिकृत अतीक्रमण शिवचरण रामाजी सोनवाने, मु. ऊकारा यांनी केले आहे.

        यात वनविभाग त्या अनुषंगाने उप जिल्हाधिकारी, (महसूल) यांनी संदर्भीय पत्रान्वे कार्यवाही करण्याचे नमुद केलेले आहे. परंतु आपल्या कार्यालाकडून सदर प्रकरणाची कोरी कार्यवाही करण्यासाठी विलंब होत आहे. संबंधीत प्रकरण गांर्भीयाने सबंधीत प्रकरणावर १५ दिवसाच्या आत कार्यवाही न झाल्यास ग्रा.पं. कार्यालय व क्षेत्रवासी ऊकारा तर्फे बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला. याबाबद महसूल जिल्हाधिकारी यांनी १६/१०/२०२३ ला उपवनसंरक्षक, वनविभाग भंडारा यांना पत्र दिले की उकारा गट क्र. २६३ आराजी ०.६५ हे. आर क्षेत्रावरील अतिक्रमणाबाबत आराजी (0.65 क्षेत्रावरील अवैध व बनावट दस्ताऐवज तयार करुन अनाधिकृत अतिक्रमण शिवचरण रामजी सोनवाने हयांनी केलेले आहे. सदरील बोगस अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावा व संबंधित अतिक्रमण धारकांविरुध्द गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करण्यात यावी. त्याअनुषंगाने अतिक्रमण धारक शिवचरण रामजी सोनवाने रा. उकारा यांचे वनहक्क प्रकरण दिनांक १२/०९/२०२३ च्या जिल्हास्तरीय वनहक्क समितीच्या सभेत निर्णयाकरीता ठेवण्यात आले व खालील कारणांमुळे दावा अपात्र करण्यात आलेला आहे.

          १) दिनांक १३/१२/२००५ पुर्वीचे अतिक्रमण असल्याचा सिध्द करणारा पुरावा जोडलेला नाही. २) “गुगल अर्थ” व्दारे पाहणी केली असता सदर अतिक्रमण २०१९ मध्ये करण्यात आले आहे. ३) वनविभागाचा अहवाल नमुना अ व जीपीएस मध्ये वनपालाची खोटी स्वाक्षरी केलेली आहे.४) वनपरीक्षेत्र अधिकारी यांच्या अहवालानुसार २०१९ पुर्वी अतिक्रमण नव्हते. ५) अतिक्रमण पंजीवर खाडाखोड केलेले असल्याने नोंद रद्द करण्यात आलेली आहे. ६) वनहक्क समितीचा पडताळणी निष्कर्षामध्ये वनहक्क समिती अध्यक्ष सचिव यांच्या खोटया स्वाक्ष-या केलेल्या आहेत.

         ७) ग्रामपंचायत उकारा यांच्या ग्रामसभेचा ठराव हा तहकुब ग्रामसभेचा आहे. सबब नियमानुसार उचित कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा असे पत्र दिले असूनही कारवाई का होत नाही.? याकरीता पुन्हा ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांसह १९ ऑक्टों‌.२०२३ ला निवेदन देण्यात आले. यात सरपंचा शालु धनंजय इळपाते, उपसरपंच हिवराज खोटेले, सदस्य दिक्षा राऊत, जिजा कठाणे, वैशाली मोटघरे, विजय इळपाते, भिमराज रामटेके, वन समिती अध्यक्ष नंदलाल भलावी, सचिव नरेश इळपाते, तंटामुक्ती अध्यक्ष अर्जुन इळपाते, गणेश खोटेले, निलकंठ कठाणे, ओमप्रकाश पालीवाल, पं.स.सदस्य अर्चना ईळपाते, वसंता इळपाते, विनायक कापगते यांच्या स्वाक्षऱ्यांसह पुन्हा निवेदन दिले असून यामध्ये आता १५ दिवसांत कारवाई न झाल्यास बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.