उद्या प्रा.नितेश कराळे भिसीत… — चला अधिकारी घडवूया विषयातंर्गत व्याख्यान… — चिमूर तालुक्यातील विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण मार्गदर्शनाची चालून आली संधी..

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे

            वृत्त संपादीका

            फिनिक्स अकॅडमी वर्धा संचालक प्रा.नितेश कराळे हे उद्या भिसीत येणार आहेत.त्यांचे,”चला अधिकारी घडवूया,या विषयातंर्गत व्याख्यान होणार आहे.प्रा.नितेश कराळे यांची वऱ्हाडी व ग्रामीण भाषेतील तोफ उद्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून शब्द शस्त्राच्या माध्यमातून धडकणार आहे.

           या जाहीर व्याख्यान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री तथा वंचितचे पुर्व विदर्भ मुख्य संयोजक डॉ.रमेशकुमार गजबे असणार आहेत तर कार्यक्रमाचे उद्घाटन चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा काँग्रेस पक्ष ओबीसी सेलचे महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ.सतिष वारजूकर करणार आहेत.

          सदर व्याख्यान कार्यक्रमाचे मुख्य अतिथी काँग्रेस पक्ष ओबीसी सेलचे महाराष्ट्र राज्य संघटक धनराज मुंगले,माजी जिल्हा परिषद सदस्य तथा गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे अधिसभा सदस्य विजय घरत,कला वाणिज्य महाविद्यालय भिसीचे प्रा.डाॅ.नथ्युजी गिरडे,समाजसेवक सचिन गाडीवर,जेष्ठ नाट्य रंगकर्मी कादरबाबू शेख,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट चिमूर विधानसभा अध्यक्ष अरविंद रेवतकर,चिमूर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ.विजय गावंडे,भिसी पोलिस स्टेशनचे ठाणेदार साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद राऊत,चिमूर पंचायत समितीचे माजी सदस्य प्रदीप कामडी,भिसी येथील विठ्ठल रुख्खमाई देवस्थान अध्यक्ष गरिबाजी निमजे हे असणार आहेत.

           व्याख्यान कार्यक्रमाचे स्थळ श्री.विठ्ठल रुखमाई देवस्थान भिसी सभागृह आहे.

          दिनांक २८ जानेवारी २०२४ रोज रविवारला आयोजित करण्यात आलेला व्याख्यान कार्यक्रम दुपारी ३ वाजता सुरू होणार आहे.कार्यक्रमाचे आयोजक रोजगार व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र भिसी,ता.चिमूर, जिल्हा चंद्रपूर चे पदाधिकारी व सदस्य आहेत.

     विद्यार्थ्यांनी येताना ड्रेस मध्ये यावे आणि काॅलेजचे व शाळेचे ओळख पत्र आणावे असे आयोजकांनी सुचित केले आहे.

        २ ते ३ वाजताच्या दरम्यान बैठक आसन राखीव करायचे आहे.तद्वतच व्याख्यान आयोजकांतर्फे विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची बसण्याची व्यवस्था वेगवेगळ्या ठिकाणी केली जाणार आहे.