विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी स्वतःशीच स्पर्धा केली तर यश निश्चित मिळेल :- उपायुक्त दशरथ कुळमेथे

      रामदास ठुसे

विशेष विभागीय प्रतिनिधी 

चिमूर:-

        विद्यार्थ्यांनी स्वतःचा अभ्यास स्वतः करावा. अभ्यासासाठी स्वतःशीच स्पर्धा केली तर यश निश्चित मिळेल असे प्रतिपादन उपयुक्त दशरथ कुळमेथे यांनी आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमुरच्या वतीने कोलारा येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.

           ते मार्गदर्शनात पुढे म्हणाले की, भी वरपास होणारा विद्यार्थी असुन मला दहावीत फक्त ५३ टक्के गुण मिळाले होते तसेच १२ वीत ५२ टक्के गुण नंतर बी.ए., एम.एस.डब्लु., एम. फिल. शिक्षण गरीबीतुनच स्वतः मजुरीची कामे करून शिक्षण घेतले. वाहतुक नियंत्रक, वार्डन, अधिक्षक, मेडीकल सुपरवायझर ते उपायुक्त आदिवासी विभागापर्यंत एकूण ५० स्पर्धा परिक्षा देवुन सात ठिकाणी नोकरी मिळवुन यशस्वी झालो.

              साधारण खेडयातुन शिक्षण घेवुन घरचे सोने विकुन मुलाखतीस जावे लागले. मी सतत अभ्यास केला. नोकरी लागल्यानंतरही सहा तास अभ्यास करीत राहीलो. सरतेशेवटी उपायुक्त पदावर एम. पी. एस. सी. तुन चौथा मेरिट येवुन या पदावर पोहोचलो. मी नेहरू युवा केंद्रात कार्य करून व एम. एस. डब्लु. चा अभ्यासक्रम करून मी घडलो व पुढे निघालो. ग्रामीण विद्यार्थ्यांनी खुप अभ्यास करा. अभ्यास करतांना कोणताही न्युनगंड बाळगू नका. पुढे जा सकाळी ५ वाजता उठुन अभ्यास करा. शिक्षण फक्त नोकरीसाठीच घेवु नका. छोटे छोटे व्यवसाय करा यासाठी त्यांनी आपला नरेंद्र मडावी व ताईचे उदाहरण देवुन शासनाच्या भरपुर योजना आहेत, त्याचा लाभ घ्या.

             मोबाईलचा चांगल्या कामासाठी वापर करा. भरपुर अॅप आहेत. त्या शिक्षणासाठी बघा. कामाची लाज बाळगू नका. आजपर्यंत अभ्यासाचा रिचार्ज मारण्याची टेक्नालॉजी आलेली नाही. त्यामुळे स्वतःचा अभ्यास स्वतः करा. स्वतःशी अभ्यासाची स्पर्धा करा असे ते एक तास दहा मिनिटे व्यक्त झाले, मोठया उत्साहात बँड व लेझीम पथकाच्या सहायाने त्यांच्या स्वगावात त्यांची विजयी मिरवणुक काढण्यात आली.

           यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन प्राचार्य शुभांगी लुंगे यांनी शिबिराविषयी ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. याप्रसंगी गावचे सरपंच शोभाताई कोयचाडे, गजानन सिडाम, संजय ठाकरे, इंद्रायनी रामटेके, संगिता कुळमेथे, रेखा गणवीर, किशोर गभणे, डॉ. सुनिल झाडे, डॉ. सुरेश हुमने आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन डॉ. चंद्रभान खंगार यांनी केले तर उपस्थितांचे आभार कु. कोमल वंजारी यांनी मानले.