बहुजनांचे अधिकार नाकारणाऱ्या व बहुजनांना गुलाम बनविणाऱ्या,”मनुस्मृतीचे दहन, देशात जागोजागी… — अनुसूचित जातींच्या लोकांना व देशातील सर्व स्त्रियांना तर मनुस्मृतींच्या कायद्यानुसार अजिबात अधिकार नव्हते.

प्रदीप रामटेके

  मुख्य संपादक

           देशातील मानवी मुल्यांचे हनन करणारा व त्यांचे सर्व प्रकारचे अधिकार नाकारणारा ग्रंथ म्हणजे ब्राह्मण धर्म ग्रंथ मनुस्मृती होय.

           या ग्रंथातंर्गत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश, शुद्र असे चार वर्ण पाडण्यात आले होते व पाचवा अतिशुद्र वर्ण पाडण्यात आला होता.

           या ग्रंथातंर्गत ब्राह्मण सर्व प्रकारचे देवाधिदेव व सर्वाधिकारी होते.त्यांनी वाईटातले वाईट व अयोग्य कृत्य केले तरी ते पुण्य कर्माचे मानकरी होते.त्यांच्या मताप्रमाणे त्यांची सर्वांनी सेवा करावी व त्यांच्या झोळीत त्यांच्या म्हणण्यानुसार नेहमी दान टाकावे असे स्पष्ट सांगितले आहे.

         दुसरा वर्ण म्हणजे क्षत्रिय,क्षत्रियांनी राज्य स्थापित करावे,लढावे,व ब्राह्मणांच्या म्हणण्यानुसार राज्य चालवावे असा मनुस्मृतीचा नियम होता.

           तिसरा वर्ण म्हणजे वैश्य होय.वैश्यांना व्यापार करण्याचे अधिकार बहाल केले होते.तात्कालीन व्यवस्थेत फक्त वैश्यांना व्यापार करण्याचा अधिकार मनुस्मृतींने दिला होता.

        तद्वतच ब्राह्मण,क्षत्रिय,वैश्य यांना उच्चवर्णीयाचा दर्जा देण्यात आला होता.या दर्जातंर्गत या तिन्ही वर्णांच्या लोकांची सेवा करण्याचा अधिकार शुद्रांना दिला होता.

      चौथा वर्ण म्हणजे शुद्र होय.चौथा वर्ण म्हणजे या देशातील सर्व ओबीसी,व इतर मागासवर्गीय समाज होय.या समाजातील नागरिकांनी तिन्ही उच्चवर्णीयांची सेवा करावी असा आदेश मनुस्मृतींचा होता.

         शुद्रांना धनसंचय करण्याचा,व्यापार करण्याचा व शिक्षण घेण्याचा अधिकार नाकारण्यात आला होता‌.देवळात शुद्र गेले तर देव बाटत होता.अर्थात शुद्रांना महत्वपूर्ण देवळात जाण्याची बंदी घातली होती.

      पाचवा वर्ण म्हणजे अतिशुद्र होय,म्हणजेच आजच्या स्थितीत अनुसूचित जातीतील सर्व लोक होत.अतिशुद्रांना सर्व प्रकारचे अधिकार नाकारण्यात आले होते व यांच्या वस्त्या गावकुसाबाहेर करण्याचा आदेशच मनुस्मृतींचा होता.यांच्या सावलीचा व स्पर्शाचा विंटाळ,ब्राह्मण,क्षत्रिय,वैश्य,शूद्रांना,होतोय अश्या प्रकारची जहाल – जुलमी अन्यायकारक व अत्याचारकारक परंपरा मनुस्मृतींच्या नियमांनुसार लादण्यात आली होती.

        मनुस्मृतीच्या कायद्यांने तर देशातील सर्व स्त्रियांवर अंकुश लावला होता,पुरुष जसे म्हणतील तसेच करावे लागत असे,पुरुषांनी कोणत्याही प्रकारचा अत्याचार केला तरी तो निमुटपणे सहन करावे हेच त्यांचा आयुष्यात होते.त्यांना चुल व मुलं या पुरते मर्यादित करून ठेवले होते.मनुस्मृतींच्या नियमांनुसार स्त्रियांना सर्वप्रकारचे अधिकार नाकारण्यात आले होते.सतीप्रथा म्हणजे पती मेल्यानंतर त्याच्या शरणावर जिवंतपणे आहुती देणे, केशवपन करणे,विधवा नंतर जैसे थे राहणारे जिवन,शिक्षणाची बंदी आणि इतर सर्व प्रकारचे अधिकार नव्हते.

        देशात अनेक संतमहापुरुषांचा जन्म झाला,त्यांनी आपापल्या परीने वर्णव्यवस्थेवर प्रहार केले.मात्र मनुस्मृतींच्या कायद्यांना त्यांना रोकता आले नाही.

          आधुनिक काळात सामाजिक क्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी वेगवेगळ्या कर्तव्यातंर्गत वर्णव्यवस्थेवर प्रहार करीत वर्णव्यवस्थेला जबरदस्त हादरे देण्याचे महान कार्य केलीत.तद्वतच सर्व समाज घटकातील मुलींसाठी व अतिशुद्रांना शिक्षणांचे दरवाजे खुले करुन महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शैक्षणिक क्रांती घडवून आणली, शेतकऱ्यांना बरेच अधिकार मिळवून दिले. तसेच सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी त्यांच्या महान कर्यांची अमूल्य देण आहे.

        राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी तर आरक्षण लागू करुन सर्व समाजातील नागरिकांना आपल्या संस्थानात नोकरी दिल्यात.विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वस्तीगृहाची व्यवस्था केली.शिक्षणासाठी शिष्यवृत्ती लागू केली.समता प्रस्थापित करण्यासाठी कठोर पाऊल उचलीत.

          मात्र ,युगप्रवर्तक तथा जगविख्यात थोर समाजसुधारक यांनी,”जहाल व अत्याचारी वर्णव्यवस्थेचे जतन करणाऱ्या मनुस्मृती अंतर्गत कायद्याच्या मुळांवरच वारंवार वार केलीत व मनुस्मृतीचे जाचक कायदे देशातील नागरिकांना समजावून सांगितले.याचबरोबर बहुजन समाजातील सर्व नागरिकांना व देशातील सर्व स्त्रियांना गुलाम बनवून ठेवणाऱ्या मनुस्मृतीचे, २५ डिसेंबर १९२७ ला महाड येथे सामुहीकपणे दहन केले.

                तद्वतच विश्वरत्न प्रकांड पंडित डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी विषमता, समता, अंधश्रद्धा, न्याय, स्वातंत्र्य, बंधुत्व, माणुसपण, माणुसकी, गुलामी,मानसिक गुलामी, उन्नती,प्रगती,विकास,अधिकार-हक्क, लोकप्रतिनिधीत्व, शासकीय-प्रशासकीय-खाजगी कार्यालयातील प्रतिनिधीत्व,लोकशाही,व्यवसाय,शिक्षण,शेती व शेतकरी,धरणे,तलाव,सिंचन व्यवस्था,आरोग्य,मताधिकार या संबंधाने इत्यंभूत माहिती देशातील सर्व नागरिकांना आपल्या अपार कार्याच्या माध्यमातून करुन दिली‌.

             एवढेच काय तर भारतीय संविधान लिहून देशातील सर्व नागरिकांचे हक्क कायम केलीत व सर्व प्रकारचे अधिकार बहाल केलीत.

            संविधान निर्माते तथा बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच या देशातील सर्व नागरिकांसह ओबीसी,एससी,एसटी, अल्पसंख्याक समाजातील नागरिकांना व आयाबहिनींना सर्व प्रकारचे हक्क मिळाले आणि उत्तम असे मानसन्मानाचे जिवन जगण्याचे मार्ग मोकळे झालेत हे वास्तव व सत्य आहे.

             या देशातील बहुसंख्य समाजातील म्हणजे ओबीसी,एससी, एसटी,अल्पसंख्याक,इतर समाज घटकातील नागरिक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महान कार्याला समजून घेत आहेत आणि स्वतःतात बदल घडवून आणत आहेत,जागरूक होत आहेत,एकसंघ होत आहेत,आपल्या हक्कासाठी संघर्ष करीत आहेत.

             बहुजन समाजातील नागरिक जागरूक होत असल्यामुळेच त्यांच्या द्वारा,”काल मनुस्मृती दहन दिनाच्या निमित्ताने २५ डिसेंबरला भारत देशांतर्गत विविध ठिकाणी मनुस्मृतीचे दहन मोठ्या प्रमाणात करण्यात आले व जहाल जुलमी आणि जहाल अत्याचारी अशा ब्राह्मणी ग्रंथ मनुस्मृतीचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.