हरिजागर व नामाचा जयघोष करुन भरगच्च कार्यक्रमांतंर्गत सप्ताहाचा पाचवा दिवस उत्साहात संपन्न.. — पिंपरी बुद्रुक येथील ग्रामस्थांसह भाविकांनी केली आवश्यक व्यवस्था..

   बाळासाहेब सुतार

  तालुका प्रतिनिधी इंदापूर 

        निरा नरसिंहपूर

         अखंड हरिनाम सप्ताह निमित्त पाचव्या दिवसाची कीर्तन सेवा ह.भ.प.राम महाराज आभंग वडापुरी यांची झाली.

         पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे सालाबाद प्रमाणे श्री गुरु दत्त जयंती निमित्ताने ग्रामस्थ व भाविक भक्त यांच्या सौजन्याने अखंड हरिनाम सप्ताहाचे तिसऱ्या वर्षाचे आयोजन करण्यात आले आहे. 

              जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे विद्यमान आकरावे वंशज श्री गुरु बापूसाहेब महाराज देहुकर मळवली यांच्या मार्गदर्शनाने व श्री गुरु सोहम महाराज देहुकर यांच्या नेतृत्वाखाली अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

                पाचव्या दिवसाची कीर्तन सेवा ह.भ.प. राम महाराज आभंग वडापुरी यांची झाली तर त्याच दिवशी अन्नदाते शिवाजी आण्णासाहेब बोडके,माजी सरपंच श्रीकांत शिवाजी बोडके,पोपट शिवाजी बोडके यांच्या वतीने भोजनदान देण्यात आले.

             तसेच संपूर्ण सप्ताहासाठी आठ दिवस सकाळी चहाची व्यवस्था आबासाहेब गजानन बोडके यांच्या वतीने देण्यात येत आहे तर दररोज सकाळी आठ दिवस अल्पो आहारची व्यवस्था शरद विठ्ठल बोडके यांच्याकडून करण्यात येत आहे.

            आठ दिवस फुल आणि हार व्यवस्था नबेलाल शाबुधीन शेख यांच्याकडून होत आहे तर आठ दिवस शुद्ध पाण्याची व्यवस्था तेजस एक्वा यांच्याकडून होत आहे.

              मंडप-स्पीकरची व्यवस्था विठ्ठल साऊंड सर्विस गणेशवाडी विठ्ठल गायकवाड यांच्याकडून केल्या गेली आहे.सप्ताहासाठी संपूर्ण आचारी सेवा ह.भ.प..शिंदे बुवा बिजवडी यांची चालु आहे.

              गेली तीन वर्षा पासून सप्ताहाचे नियोजन करण्याचे प्रयत्न व गाव पातळीवरील सर्वच पिंपरी ग्रामस्थ व कार्यकर्ते मिळून एकत्र बैठक करून सप्ताहाचे आयोजन करण्याची भूमिका ह.भ.प.महेश सुतार महाराज यांनी केली. 

            याबद्दल सर्वच भाविक व ग्रामस्थांकडून महेश सुतार यांचे कौतुक होऊ लागले.

            हरिजागर व नामाचा जयघोष करून भरगच्च कार्यक्रमाने सप्ताहातंर्गत पाचव्या दिवसाची सेवा झाली.सप्ताहासाठी समस्त ग्रामस्थ पिंपरी बुद्रुक,आजी- माजी सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य व वारकरी आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने दररोज येत आहेत व आनंदाने महाभोजन घेऊन आनंद घेत आहेत.

              सर्व भागातील भाविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने नामाचा रस घेण्यासाठी हजारोच्या संख्येने दररोज उपस्थित राहात आहेत.

           अखंड हरिनाम सप्ताहाचे संपूर्ण नियोजन आयोजन हे पिंपरी बुद्रुक येथील सर्वच ग्रामस्थ व भाविक भक्त करीत आहेत आणि संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचेलन ह.भ.प.महेश महाराज सुतार हे करीत आहेत.

*****

चौकट…

         प्रत्येक वर्षी सालाबाद प्रमाणे पिंपरी बुद्रुक येथील सर्व ग्रामस्थ व भाविकांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहासाठी मोठ्या प्रमाणात आन्नदान सेवा करण्यात येत आहे.