चिमूर येथे शहीद वीर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके १६६ वा स्मृतिदिन आणि गोंडी पुणेम सम्मलेन व सांस्कृतिक नृत्य कार्यक्रमाचें आयोजन.. — कार्यक्रमाला राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्वयक चिमूर विधानसभा क्षेत्र डॉ.सतीश वारजुकर यांची उपस्थिती..

    रामदास ठुसे

विशेष विभागीय प्रतिनिधी 

    शहीद वीर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके यांचा स्मृतिदिन कार्यक्रम चिमूर येथील जागतिक गोंड संगा मांदी शाखा चिमूरच्या वतीने गोंड मोहल्ला येथे आयोजित करण्यात आला होता.

         या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून डॉ.सतीश वारजूकर, प्रमुख अतिथी म्हणून तालुका अध्यक्ष डॉ. विजयजी गावंडे,अध्यक्ष म्हणून मनोज शिंह गोंड मडावी,विजय शिंह मडावी, संदीप कावरे,वैधकीय अधिकारी डॉ.आनंद किन्नाके,सहायक लेखाधिकारी विकासजी सिडाम, सौ.उर्मिला वरखडे,सौ.माधुरी वरखडे,नागोजी मडावी,दागोजी वरखडे,व समाज बांधव उपस्थित होते

         आयोजित स्मृतिदिनानिमित्त दुसऱ्या सत्रात गोंडी रेला सांस्कृतिक नृत्य महोत्सव कार्यक्रमाची सुरुवात शहीद वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून आणि आदिवासी प्रथेनुसार विधिवत पूजा अर्चना करून करण्यात आली. 

         यावेळी डॉ.सतिश वारजुकर यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. 

         मात्र,त्यातही अनेक थोर क्रांतिकारकांचे बलिदान आणि शौर्य अजूनही उपेक्षित असेच आहे. त्यापैकीच एक आहेत थोर क्रांतिकारी शहिद वीर बाबुराव पुलेसुर शेडमाके यांचे बलिदानाबद्दल बहुमूल्य मार्गदर्शन करून शहिदाचे प्रतिमेला अभिवादन केले.