विजय मिळवून देणारा दिवस म्हणजे दसरा- डॉ. संजय आगाशे… — दसरा निमित्त तालुका क्रीडा संकुल येथील व्हॉलीबॉल मैदान ची पूजा…

     ऋग्वेद येवले

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

          साकोली:असत्यावर सत्याच्या विजय म्हणून दसरा साजरा करतात. हा सण भारतीय संस्कृतीच्या वीर उपासक शौर्याचा उपासक आहे. विद्या ,शौर्य, मनसंपादन करण्यास विजय मिळवून देणारा दिवस म्हणजे दसरा होय. असे प्रतिपादन डॉ. संजय आगाशे यांनी हॉलीबॉल चे मैदानाची पूजा करताना मार्गदर्शनात सांगितले.

          याप्रसंगी तालुका क्रीडा संघटक शाहिद कुरेशी डॉ. जितेंद्र कुमार ठाकूर व व्हॉलीबॉल केंद्रातील सर्व खेळाडू उपस्थित होते. 

            क्रीडा संघटक कुरेशी यांनी सांगितले की, तालुका क्रीडा संकुल च्या भव्य मैदानावर बाल दुर्गा उत्सव व दसरा महोत्सव समितीतर्फे दरवर्षी रावण दहन कार्यक्रम आयोजित करण्यात येतो ,यानंतर हॉलीबॉल चे खेळाडू हॉलीबॉल च्या मैदानावर, मैदान व साहित्यांची पूजा करतात.

           याप्रसंगी रुपेश चीरवतकर, अनिकेत नागोसे,युवराज बोबडे, शोएब शेख, सुहानी ठाकरे, पियुष बांगरे व सर्व आजी-माजी खेळाडूंच्या उपस्थितीत मैदानाचे पूजन करण्यात आले.