वैनगंगा शारिरीक शिक्षण महाविद्यालयात राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन…

     ऋग्वेद येवले

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

साकोली : वैनगंगा शारीरिक शिक्षण महाविद्यालय येथे क्रीडा व्यवस्थापन वर राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन. वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था नागपूर द्वारा संचालित वैनगंगा शारीरिक शिक्षण महाविद्यालय साकोली येथे संस्थापक अध्यक्ष डॉ. ब्रह्मानंद करंजेकर व संस्था अध्यक्ष डॉ. सोमदत्त करंजेकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा व्यवस्थापनावर राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

             कार्यक्रमाची सुरवात माता सरस्वतीच्या पूजेने झाली. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. संजय राजाराम आगाशे, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख एस. एन. मोर कॉलेज तुमसर यांनी केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले कि आजच्या काळात क्रीडा व्यवस्थापन हा एक मोठा विषय आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होत आहे.

         कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून डॉ. जितेंद्रकुमार ठाकूर, प्राध्यापक राजीव गांधी महाविद्यालय सडक अर्जुनी यांनी विद्यार्थ्यांना मैदान बनवणे, खेळ साहित्य बनवणे, त्याच बरोबर शारीरिक शिक्षण विद्यार्थ्यांच्या रोजच्या आयुष्यात कश्याप्रकारे महत्वाचे आहे या बद्दल सविस्तर माहिती त्यांनी सांगितली.

         या कार्यक्रमाचे अध्यक्ष वैनगंगा शारीरिक शिक्षण महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. सुनील चतुर्वेदी होते. त्यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले आणि क्रीडा व्यवस्थापनासाठी प्रशिक्षित व्यावसायिकांची वाढती गरज असल्याचे सांगितले. क्रीडा उद्योग हा देशातील सर्वात मोठ्या आणि वैविध्यपूर्ण उद्योगांमध्ये स्थान मिळवत राहील.भविष्यासाठी करिअरच्या संधी निर्माण करेल असे त्यानी सांगितले व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

          कार्यक्रमाचे संचालन डॉ.राजश्री यांनी केले व आभार प्रदर्शन श्री. नीरज अतकरी यांनी केले. या कार्यक्रमाकरिता देवेंद्र इसापुरे, पुकराज लांजेवार, शाहीद सय्यद, दिव्या कुंभारे व महाविद्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी झाले.