आर्चरी स्पर्धेत एकविरा स्कूल ऑफ ब्रिलियंट्सचे चार विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर… 

युवराज डोंगरे/खल्लार

         उपसंपादक

            एकविरा स्कूल ऑफ ब्रिलियंट्सच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी करत शाळेचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचवले आहे. स्थानिक दर्यापूर येथील एकविरा स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चित्रकुट येथील इंटरनॅशनल स्कूल अहमदनगर येथे सीबीएसई साउथ झोन 2 आर्चरी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवत विद्यार्थ्यांनी आर्चरी या खेळात नावलौकिक मिळवला आहे.

          वर्ग 9 मधील प्रत्युष नळकांडे, रुद्राक्ष कराळे, ऋषिकेश काळे ,अर्णव बोंडे, या चारही विद्यार्थ्यांनी अचूक नेम लावत विजय संपादित केला आहे या चारही विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर निवड सुद्धा झाली आहे चारही विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर क्रीडा स्पर्धेत सुद्धा नेत्रदीपक कामगिरी केली आहे.

         त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियांनी सुद्धा विशेष मेहनत घेत मुलांना खेळाचे साहित्य पुरवले तर शाळेचे क्रीडाशिक्षक विजय शिरसाट सर व क्रीडा शिक्षिका अर्चना साखरे , यांनी योग्य मार्गदर्शन करत चारही विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तर गाठला राष्ट्रीय स्तरावर निवड झाल्याने प्राचार्या उज्वला गायकवाड मॅडम, विद्यार्थी गण, व शालेय विश्वस्त मंडळांनी पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.