सेन्ट्रल बँकेच्या वतीने चिखलदरा येथे कर्ज वितरण मेळावा संपन्न..

चिखलदरा तालुका प्रतिनिधी

दखल न्युज भारत

अबोदनगो चव्हाण

 

चिखलदरा -सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा चिखलदराच्या वतीने चिखलदरा पंचायत समिती कार्यालय येथे महीला बचत गट कर्ज वितरण मेळावा चिखलदरा पंचायत समितीचे बिडीओ जंयत बाबरे याच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता.

           मेळाव्यात ९० लाख रुपये महीला गटाना कर्ज म्हणुन देण्यात आले.चिखलदरा शाखेचे शाखा प्रबंधक स्वप्नील इंगळे हे प्रमुख अतीथी म्हणुन उपस्थित होते.एस.एच.जीचे क्वाडनेटर पाटिल सर,चिखलदरा शाखेचे कृषी अधीकारी सुनील धिक्कार सह कर्मचारी पलाश सोनुने,रिलेश सादत पठान,प्रेम कास्देकर, शाखेचे बि.सी.रमेश गाठे,शाखेची शखी खडके मॅडम,सरोजिनी मॅडम,ममता नागले,पारबती धिक्कार हे उपस्थित होते.

           मेळघाट मध्ये पहिल्यांदा अशा प्रकारे एकाच वेळी ९० लाख रुपयांचे कर्ज मंजुर करून महिला बचत गटाला वितरण करण्यात आले.

        या प्रसंगी चिखलदरा पंचायत समितीचे बीडीओ जंयत बाबरे यांनी बचत गटाच्या महिलांना योग्य व्यवसाय करुन स्वालंबी होण्याचा व वेळीच कर्जाची परतफेड करुन पुन्हा नवीन कर्ज घेण्याचे आव्हान केले.

           चिखलदरा शाखेचे शाखा व्यवस्थापक स्वप्नील इंगळे यांनी सर्व महीलांना बँकचे सहकार्य करण्याचे आव्हान केले.या दरम्यान अल्पोहार वितरीत करण्यात आले.या करिता बचत गट सयोगनी यांनी विषेश सहकार्य केले.