आळंदीत उद्या आरोग्य शिबीर व समाजरत्न पुरस्कार सोहळ्याचे आयोजन.

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

आळंदी : येथील कै.डाॅ.बच्चुबाई चौहान बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आळंदी आणि परिसरात नागरिकांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे तसेच समाजातील विविध कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना समाजरत्न सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे असे संस्थेचे अध्यक्ष गंगाधर भेंडेगावकर यांनी सांगितले.

          या सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लिज्जत उद्योगसमूहाचे सुरेश कोते असणार आहे, यावेळी डॉ.संजीव ठाकूर, डॉ.माधव चंबुले, भाजपचे शहराध्यक्ष किरण येळवंडे, संतोष कुंभार, राज्याबाई भेंडेगावकर, संतोष गोरे उपस्थित राहणार आहेत.

          समाजरत्न सन्मान पुरस्काराने यावेळी अनेक मान्यवरांना गौरविण्यात येणार आहे यात प्रामुख्याने माजी महापौर नितीन काळजे, डॉ.प्रकाश चौधरी, व्यंकटराव घटाकर, बालाजी कल्याणी, जयवंतराव पाटील, अश्विनी कासनाळे, डॉ.मनोज जाधव, विशाल शिंदे, विजय देवढे, रत्नाकर कांबळे, गजानन कोलमकर, डॉ.शिवाजी सगर, अनिल चौहान, चंद्रकांत पाटील‌ यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे असे संस्थेचे सचिव आर.जी.भेंडेगावकर यांनी सांगितले आहे.