कलाकारांचा मानधन 5000 द्या… — वंचित बहुजन आघाडी तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन…

नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

         भंडारा -वंचित बहुजन आघाडी शाखा साकोली जिल्हा भंडाऱ्याच्या वतीने कलावंतांना मानधन वाढविण्याविषयी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आली आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कलाकार असून त्यांना सरकारतर्फे 2250 रुपये मानधन मिळतो. हा अतिशय कमी असून महागाई मध्ये परवडत नाही. सर्वच प्रकारच्या खर्च वाढलेला आहे. महागाई वाढलेली आहे,त्यामुळे मानधन 5000 रुपये करण्यात यावे.

         तसेच वयाची अट 50 वरून 40 वर्षे करावी तसेच इन्कम ची अट असू नये. त्यामुळे जास्तीत जास्त कलाकाराना फायदा होईल.त्या दृष्टिकोनातून मागण्या सरकारतर्फे करण्यात आलेल्या आहे आणि निवेदनवंचीत बहुजन आघाडी महिला तालुका अध्येक्ष तनुजा नागदेवे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे.

        याप्रसंगी निवेदन वंचीत बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष धनपाल गडपायले, भंडारा गोंदिया महिला निरीक्षक सुनिता टेभूर्ण ,जिल्हा महासचिव दिलीप वानखेडे, जिल्हा संघटक डी जी रंगारी, लाखनी महिला अध्यक्ष ममता श्यांकुवर, लाखांदूर महिला अधेक्स, मुंनीताई शेंडे, यादोराव गणवीर,श्रावण नंदेश्वर जगदीश रंगारी, श्रीकांत नागदेवे, नितीन श्यामकुवर, प्रभाकर मेश्राम, मुस्ताक पठाण व कलाकार , वंचित बहुजन महिला आघाडीचे कार्यकर्ते निवेदन देताना भरपुर उपस्थित होते.