क्रीडा पर्वाचे आ. किशोरभाऊ जोरगेवार यांच्या हस्ते उद्घाटन….. — 4 दिवस चालणार हा क्रीडा पर्व… — नेटबॉल, हॉकी, कबड्डी स्पर्धेचे आयोजन..

प्रेम गावंडे

उपसंपादक

दखल न्युज भारत

          डेव्हलपमेंट अँड रिसर्च एज्युकेशन मल्टीपर्पज सोसायटी (ड्रीम) चंद्रपूर तर्फे क्रीडा दिनाच्या पूर्वसंध्येला हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंती व क्रीडा दिनाचे अवचित साधून “क्रीडा पर्वाचे” आयोजन 26 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट 2023 दरम्यान करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन आ. किशोरभाऊ जोरगेवार यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाचेअध्यक्षस्थानी पप्पू देशमुख माजी नगरसेवक मनपा चंद्रपूर होते. प्रमुख पाहुणे म्हणून अभिजीत दुर्गे उपाध्यक्ष ड्रीम चंद्रपूर, रुपेशसिंग चौहान सचिव हॉकी प्रमोटर असोसिएशन चंद्रपूर, प्रभाकर टोगर उपाध्यक्ष हॉकी प्रमोटर असोसिएशन चंद्रपूर, निखिल पोटदुखे सचिव डी नेटबॉल असोसिएशन जिल्हा चंद्रपूर उपस्थित होते. 

        4 दिवस चालणाऱ्या या “क्रीडा पर्वात” 26 ऑगस्ट ला नेटबॉल स्पर्धा, ही स्पर्धा जिल्हा स्टेडियम ला खेळली जाणार आहे. 27 आगस्ट ला हॉकी स्पर्धा ही स्पर्धा CRC स्टेडियम येथे खेळली जाणार आहे. 28 ऑगस्ट ला कबड्डी स्पर्धा ही स्पर्धा अंश्लेश्वर वार्ड नं. 1 विद्यार्थी चौक चंद्रपूर येथे खेळली जाणार आहे. तसेच 29 ऑगस्ट ला संध्याकाळी 4 वाजता बाईक रॅली व त्यानंतर क्रीडा पर्वा चा समारोपीय कार्यक्रम संध्याकाळी 6 वाजता स्थानिक श्रमिक पत्रकार संघ वरून नाका चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.

       या क्रीडा पर्वात होणाऱ्या विविध कार्यक्रमात जास्तीत जास्त सहभाग दर्शवावा अशी विनंती ड्रीम चंद्रपूरचे अध्यक्ष प्रेम गावंडे, उपाध्यक्ष अभिजीत दुर्गे, सचिव अनिल ठाकरे, कोषाध्यक्ष निलेश शेंडे तसेच रुपेश सिंग चैव्हाण, शुभम साखरे, शुभम पुणेकर, आकाश इंगळे, मनीष जयसल, लोकेश मोहुर्ले, दिनेश सावसागडे, सिद्धार्थ सूर्यवंशी यांनी केले आहे.