ऋषी सहारे
संपादक
प्रितम जनबंधू
संपादक
अहेरी :-
कोण केव्हा लाचेची मागणी करेल याचा नेम नाही.अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाच स्विकारल्या प्रकरणी कारवाईला सामोरे जावे लागले आहे व संबंधितांचे आयुष्य मातीमोल झाले आहे.मात्र लाच घेण्याचा प्रकार बंद होताना दिसत नाही.एवढे लोभी प्रशासनातील काही महाभाग झाले आहेत.
असाच प्रकार गडचिरोली जिल्हा अंतर्गत अहेरी या ठिकाणी घडला व प्रशासन चौकस झाले.
घटनाक्रम असा की,तेंदू पत्त्याची वाहतूक करण्याकरिता नाहरकत प्रमाणपत्र देण्यासंबंधाने एका तेंदु पत्ता कंत्राटदाराकडून एक लाख तीस हजार रुपयांची लाख स्वीकारताना लाच प्रतिबंध विभागाचा अधिकाऱ्यांनी अहेरी येथील प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांसह तिघांवर जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांसह प्रतीक दिवाकर चन्नावार, संजीव येल्ला कोठारी व अनिल बुधाजी गोवर्धन अशी गुन्हा दाखल झालेल्या लाचखोरांची नावे आहेत.
प्रतीक चन्नावार हे प्रभारी गटविकास अधिकारी असून संजीव कोठारी हे कंत्राटी पेसा समन्वयक तर अनिल गोवर्धन हा खाजगी व्यक्ती आहे.
तक्रारकर्ता कंत्राटदाराने गोविंदगाव येथील तेंडू पानांचे युनिट लीलावा द्वारे खरेदी केले होते.या तेंदू पानांचे वाहतूक करण्याकरीता पंचायत समितीकडून नाहरकत प्रमाणपत्राची त्यांना आवश्यकता होती.
हे प्रमाणपत्र देण्यासाठी गटविकास अधिकारी प्रतीक चन्नावार व तालुका पेसा समन्वयक संजीव कोठारी यांनी कंत्राटदारास एक लाख तीस हजार रुपयांची लाच मागितली होती.
परंतु लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने तक्रारदाराने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली.त्यानुसार या विभागाचा अधिकाऱ्यांनी सापळा रचला व अनिल गोवर्धन यांच्या माध्यमातून तक्रार कर्त्याकडून एक लाख,तीस हजार रुपयांची लाच पंचासमक्ष स्वीकारताना रंगेहात पकडले.
गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर प्रभारी गटविकास अधिकारी प्रतीक चन्नावार फरार आहेत.
लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल माणिकर,अप्पर पोलीस अधीक्षक सचिन कदम,संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस उपअधीक्षक अनिल लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले,पोलीस निरीक्षक शिवाजी राठोड,हवालदार दत्त तोटे,राजेश पद्मगीरवार,किशोर जोंजारकर,संदीप उडान,संदीप घोरमोडे,प्रफुल डोर्लीकर यांनी संयुक्तपणे कारवाई अंतर्गत सहभागी होते.