ऋषी सहारे
संपादक
आरमोरी-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय यांनी आपली उज्वल यशाची परंपरा कायम राखत यावर्षी सुद्धा फेब्रुवारी २०२३ च्या एच.एस.सी. च्या परीक्षेत १००% निकाल दिला. परीक्षेला ७८ विद्यार्थी बसले, त्यामधून ७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकाल १००% लागला. शाळेतून प्रथम कु. अस्मिता बाबुराव वनकर हिला ७२.८३ %, द्वितीय कल्याणी रामेश्वर कपूरदेहरीया हिला ६२.८३ %, आणि तृतीय लकी मनिराम रामटेके ६२.६७ % टक्के प्राप्त झाले. प्रथम श्रेणीमध्ये ०७ विद्यार्थी, द्वितीय श्रेणीमध्ये ५० विद्यार्थी, तर तृतीय श्रेणीमध्ये २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मदन मेश्राम , सचिव प्रशांत मेश्राम , प्राचार्य व्ही. जी. शेंडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आणि उज्वल भविष्यासाठी शुभेछ्या दिल्या.