महात्मा ज्योतिबा फुले विहीगावच्या कनिष्ठ महाविद्यालयाचा उत्कृष्ठ निकाल.

 

युवराज डोंगरे 

 उपसंपादक

 

श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट अमरावती द्वारा संचालित असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय विहीगाव येथील वर्ग १२ वी चा निकाल याही वर्षी उत्कृष्ठ लागला आहे. विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के,कला शाखेचा ९७.३४ टक्के व व्यावसायिक अभ्यासक्रम शाखेचा निकाल ८८.४६ टक्के एवढा लागला.

कला शाखेतून प्रथम क्रमांक कु.नंदिनी बळीराम प्रजापती ८८.८३% द्वितीय क्रमांक कु.ऋतिका गणेश काळे ८७.८३% तृतीय क्रमांक कु.अक्षता सहदेवराव सदार ८४.८३% यांनी पटकावला तसेच कु.भार्गवी सुधीर सरकटे ८४.८३% , दर्शन सुधीर वानखडे ८२.००% हे विद्यार्थी सुध्दा प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झालेत.

 विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक ऋतुजा रावसाहेब पखान ७२.८३%, द्वितीय क्रमांक प्रिन्स सुधाकर टिपरे ७१.५० तृतीय क्रमांक तन्वी प्रशांत शिंगणे (७१.१७%)हिने पटकाविला

तसेच कविष खांदे७०.५०%,अनुश्री प्रशांत चिंचाळे (७०.३३%) व कोमल प्रशांत पोटदुखे (७०%) गुण मिळालेत.

  यशाची परंपरा कायम राखली आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्षा किर्तीताई अर्जुन,सचिव श्री राव सर, प्रशासन अधिकारीश्री पंडित सर,संस्थापक अध्यक्ष कमलताई गवई, शाळा निरीक्षक निलेश देशमुख , विद्यालयाचे प्राचार्य श्री अशोक मसने व सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.