राष्ट्रीय महामार्गावर पडले मोठ मोठे खड्डे… — ट्रक फसून ट्रक च्या लागल्या दुतर्फा लांबच लांब रांगा…

 

  भाविक करमनकर 

धानोरा तालुका प्रतिनिधी

        सततच्या आलेल्या पावसाने राष्ट्रीय महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे धानोरा ते मुरूमगाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९३० या रोडवर सालेभट्टी या गावाजवळ मोठ मोठे खड्डे पडले.

          त्या खड्ड्यात सी जी ०८ ए वी ८८८३ क्रमांकचा छत्तीसगड ला जाणारा ट्रक फसून आहे.त्यामुळे ट्रकच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक सकाळपासून एकेरी वाहतूक सुरु असून छोट्या वाहनांना वाहन काढताना कसरत करावी लागत आहे.मोठ्या वाहनाच्या तर लांबच लांब रांगा लागल्या आहेत.मोठे वाहन धारक आपली वाहने काढण्यासाठी रस्त्याची मरम्मत करत आहे.

         हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे या रस्त्यानी छत्तीसगड ला जाणारे व छत्तीसगड वरून गडचिरोली हैद्राबादला जाणारे ट्रक असे मोठे वाहन चालतात त्यामुळे रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे वाहन धारकांकडून व नागरिकांकडून रस्त्यावरचे खड्डे बुजवून रस्ता सुरळीत करावा अशी मागणी होत आहे.