सर्प मित्रांना मनपात नोकरी मिळावी.:- आपची मागणी

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

पुणे : पुणे मनपामध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या 34 गावांमध्ये मोठ्या प्रमाणात विषारी सापांचा प्रादुर्भाव असून बऱ्याच जणांचा मृत्यू यामुळे झाला आहे. दोन दिवसांपूर्वीच वारजे भागातील एका तरुण सर्पमित्राचा ( कै.विनायक मुगडे) याचा विषारी नाग चावल्यामुळे मृत्यू झाला.शेकडो कोटी खर्च करून मनपाने बरेच इस्पितळ उभे केले आहे, त्या इस्पितळमध्ये विषरोधी लस लवकर उपलब्ध करावी.

        क्षेत्रीय कार्यालयाला/अग्नीशमन केंद्राला एक याप्रमाणे पुणे मनपाच्या सर्व 15 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये एक एक प्रशिक्षित सर्पमित्राला नोकरी द्यावी जेणेकरून त्या त्या भागातील नागरिकांचे प्राण वाचतील. अश्या मागणीचे निवेदन आरोग्य विभाग प्रमुख भगवान पवार व अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांना दिले यावेळी उपस्थित आप चे निलेश वांजळे, किरण कांबळे, ओमकार वाघमारे, सुरज वांजळे सर्पमित्र इंदिरा पाटील, निहाल पायगुडे, तेजस आकडे, सत्यम भिलारे.