येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार म्हणून युवा सेना तालुका अध्यक्ष आण्णासाहेब काळे नावाच्या चर्चेला उदान.

 

नीरा नरसिंहपूर दिनांक: 25

प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,

 आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार म्हणून निरा नरसिंहपूरचे माजी सरपंच तथा युवा सेना इंदापूर तालुका प्रमुख आण्णासाहेब काळे यांच्या नावाची सर्व तोपर्यंत चर्चा होऊ लागली आहे.

बावडा /लाखेवाडी जिल्हा परिषद गटामधून निवडणूक लढविण्यासाठी शिवसेना गटाची जय्यत तयारी चालू आसुन माजी मंत्री व शिवसेना उपनेते महाराष्ट्र राज्य विजय बापू शिवतारे यांच्या मार्ग दर्शनाखाली इंदापूर तालुक्यात संपूर्ण ठीक ठिकाणी 51 शिंदे गटाच्या शाखेचे उद्घाटन करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करणार आसुन त्यापैकी दहा ते बारा शाखेचे इंदापुर तालुक्यात उद्घाटन मागील काही दिवसापूर्वी झालेले आहे.

       उर्वरित राहिलेल्या युवा सेना शाखेचे उद्घाटन लवकरच करणार आसल्याचे तालुका अध्यक्ष आण्णासाहेब काळे सांगत होते. जनतेच्या मनातील हिरा तसा उमेदवार सर्व सामान्य हक्कासाठी लढणारा गोर गरिबांचे प्रश्न मार्गी लावणारा युवा सेना तालुका अध्यक्ष आण्णासाहेब काळे हा जनतेने निवडलेला कार्यकर्ता यांच्या नावाची सर्व पातळीवर चर्चा होऊ लागली आहे.

      आण्णासाहेब काळे सामाजिक कार्यकर्ता आसो आथवा राजकीय आसो सर्व समाजाला बरोबरीने घेऊन जाणारा कार्यकर्ता सक्षम आसल्यामुळे जिल्हा परिषद पंचवार्षिक निवडणूक रिंगणात शिंदे गटातर्फे उभे राहण्यासाठी वर्णी लागणारच आशी तरुण कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला सुरुवात झाली आहे.

       तळा गाळातील जनते मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होऊन आण्णासाहेब काळे हे जनते पर्यंत पोहोचण्यासाठी गाव भेटी चालू केलेल्या आहेत बावडा /लाखेवाडी गटातील सर्वांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिवसेना एकनाथ शिंदे गट हा जनतेच्या प्रत्येक आडचणीला मदत करणारा तरून कार्य कर्त्यांचा गट आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व माजी मंत्री विजय बापू शिवतारे यांच्या माध्यमातून आनेक योजना गोरगरिबांच्या हाताला कामे व महिलांसाठी आनेक नवीन योजना तालुक्यात आणण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहणार आसल्याचे युवा सेना तालुका अध्यक्ष आण्णासाहेब काळे हे यावेळी एका कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. काळे यांनी गेली पाच वर्षांपूर्वी सरपंच पदाची धुरा हातामध्ये घेऊन गावचा विकास प्रगतीच्या दिशेने नेऊन गाव तंटामुक्ती व आदर्श पुरस्कार मिळवून दिला. घरकुल योजना,अंतर्गत रस्ते, पिण्याच्या पाण्याची सोय, संपूर्ण गाव स्वच्छता अभियान ही राबवण्यात आली.

         सरपंच पदाच्या कालखंडामध्ये 260 कोटी निधी मिळवून घेण्यासाठी सिंहाचा वाटा आहे त्या आराखड्यासाठी पाठपुरावा सरपंच आण्णासाहेब काळे यांनीच केला या गटातील मतदार मायबाप जनता माझ्यावर विश्वास ठेवतील व पुढील वाटचालीसाठी मला आशीर्वादव शुभेच्छा देतील.