आजारास कंटाळून विहिरीत उडी घेत बबन मोहने ने केली आत्महत्या.

कमलसिंह यादव 

प्रतिनिधी

कन्हान : – सहा महिन्यापासुन आजारी असुन मोति बिंदुची शस्त्रक्रिया केली. तरी आजार बरा होत नस ल्याने आजाराच्या त्रासाला कंटाळुन बोरडा येथिल बबन मोहने हयानी रात्री ला शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. 

          बोरडा (गणेशी) येथील शेतमजुर बबन उरकुडा मोहने वय ४४ वर्ष रा. बोरडा (गणेशी) हा ६ महिन्या पासुन आजारी असुन त्याने मोतिबिंदु ची शस्त्रक्रिया केली तरी सुध्दा आजारपण बरा होत नसल्याने आजा रपणाला वैतागुन मनस्थिती बरोबर नसल्याने गुरूवार (दि.२४) ऑगस्ट ला रात्री १२.३० वाजता आजारपणा कंटाळुन घरी कुणालाही न सागता जावुन घरापासुन दुर पुर्व दिशेला श्री रमेश नन्होरे यांच्या शेतातील विही रीमध्ये उडी घेवुन आत्महत्या केली.

      बबन मोहने यास पत्नी, दोन मुली व एक मुलगा आहे. कन्हान पोलीसानी फिर्यादी साळुभाऊ जगदीश रुपचंद डडुरे वय ४० वर्ष रा. बोरडा (गणेशी) यांचे फिर्यादी वरून कन्हान पोस्टे ला कलम १७४ जाफौ अन्वये मर्ग दाखल करून पुढील तपास स.फौ. सदाशिव काटे हे करीत आहे.