विश्वशांतीचे विद्यार्थी घेणार डिजिटल वर्गखोलीतून शिक्षण……

     सुधाकर दुधे 

सावली तालुका प्रतिनिधी 

           भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालित विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून डिजिटल वर्ग खोल्यांचे उद्घाटन भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव राजाबाळ पाटील संगीडवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे विश्वशांती विद्यालय सावलीचे विद्यार्थी सत्र २०२४-२०२५ पासून डिजिटल वर्ग खोलीतून शिक्षण घेणार आहेत.

       शैक्षणिक सत्र २०२४ -२५ पासून वर्ग ०५ ते ०८ वी वर्गातील एकूण ०६ वर्ग खोल्या डिजिटल करण्यात आले असून त्याचा फायदा नक्कीच विद्यार्थ्यांना होणार आहे. आणि येणाऱ्या समोरच्या शैक्षणिक सत्रामध्ये शाळेतील संपूर्ण वर्गखोल्या डिजिटल करण्याचा मानस शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

           शाळेतील वर्गखोल्या डिजिटल झाल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. असून उपस्थित पालकांनी भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावलीचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक तथा शिक्षकांचे आभार व्यक्त केले.डिजिटल वर्ग खोलीच्या उद्घाटन प्रसंगी लालाजी भोयर, वामन भोपये,खुशाल भोयर,गौरव संतोषवार,राकेश विरमलवार,पर्यवेक्षक सुधाकर मेश्राम,आदींची उपस्थिती होती.

       आमच्या विद्यालयात सावली परिसरातील ग्रामीण भागातील बहुसंख्य विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी प्रवेशित होतात,आजचे युग तंत्रज्ञानाचे यूग आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्याचे ज्ञान असणे गरजेचे आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक कार्यक्रम राबवत राबविताना शाळा आणि विद्यार्थी १०० टक्के प्रगत करण्यासाठी याचा मोठा फायदा होईल.

     रविंद्र मुप्पावार मुख्याध्यापक वि. वि. सावली