वटवृक्षाची पूजा दरम्यान महिलांवर मधमाश्यांचा हल्ला…… — बोथली येथील घटना… — जख्मीत ४ महिला १ मुलाचा समावेश… — उपचारार्थ बोथली प्रा.आरोग्य केंद्रात भर्ती…

      सुधाकर दुधे

सावली तालुका प्रतिनिधी 

      वट पौर्णिमेनिमित्त वटवृक्षाची पुजा करताना मधमाशांच्या झालेल्या हल्यात चार महिला एक मुलगा जख़्मी झाल्याची घटना शुक्रवार रोजी पाहाटे १० वाजताच्या सुमारास घडली.

        ज्योति स्वामी येदनुरवार ५० वर्ष, सपना राकेश पत्तिवार ३२ वर्ष,माया प्रकाश चेल्लीम्यालवार , ६६ वर्ष,स्वेता संदीप चेल्लीम्या लवार २५ वर्ष ,रक्ष राकेश पत्तिवार १२ वर्ष असे मधमाशांच्या हल्ल्यात जख़्मी झालेल्याची नावे असून ते बोथली येथील रहिवाशी होते.

          वट सावित्रीच्या निमित्याने वट वृक्षाची पूजा मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरी होत आहे.त्याचाच एक तालुक्यातील ग्रामीण भागात या उत्साहाचे महत्व आहे. शुक्रवार रोजी दरवर्षी प्रमाणे बोथली परिसरातील काही महिला बोथली -हिरपुर मार्गे तलाठी आफिस लगत असलेल्या वटवृषाच्या झाडात पुजा करीत असताना त्या झाडालगत असलेल्या पाण्याच्या टाकिवर काही मधमाशांच्या पोळ्यांचे वास्तव्य होते.

        शुक्रवार रोजी पाहाटे १० वाजताच्या सुमारापासून वटवृक्षाची पूजा सुरु झाली दरम्यान झाडा लगत पाण्याच्या टाकिवर असलेल्या मधमाशांच्या समुहाने पूजा करनाऱ्या महिलांवर हल्ला सुरु केला. परिणामी अचाणक झालेल्या मधमाशांच्या हल्ल्यामुळे भयभीत महिलांनी वटवृक्षापासून पूजा न करता पळ काढला आणि घराचा रस्ता धरला मात्र मधमाशांच्या समुहाने महिलांच्या घरा पर्यंत पीछा सोडला नाही. रस्त्याने धावत घराकडे जानाऱ्या महिलांना होनाऱ्या  मधमाशांच्या हल्ल्याचे दृश्य प्रत्यक्षात रस्त्यावर उभ्या असनाऱ्या अनेकांनी पाहताना आश्चर्य व्यक्त केल.

       त्या मधमाशा केवळ पूजा करनाऱ्या महिलांच्याच पिछया करणारे दृष सर्वाना आश्चर्य करणारे ठरले असले तरी महिलांना डोक्यावर पदर झाकुन पुजा स्थळावरुण पळ काढावा लागला.  लागलीच हल्ला झालेल्या महिलांना बोथली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ भर्ती करन्यात आले, असून त्यात चार महिला तर एका मुलाचा सामावेश होता.

        वाट पौर्णिमा ह्या दिवशी स्त्रियां वटपौर्णिमा नावाचे व्रतकरुण विवाहित स्त्रियां आपल्या पतीला उत्तम आरोग्य आणि दिर्घायुष्य प्राप्त होवो अशी वटवृक्षाकडे मनोकामना करतात कारण वटवृक्षात ब्रम्हा,विष्णु, महेश अशा तिन्ही देवांचा समावेश आहे असा समज आहे.

        सतीने तर आपल्या सत्यवानासाठी यमराजाचा धावा केला होता अशी दंत कथा आहे. मात्र आज रोजी वटवृक्ष पूजा दरम्यान चक्क मदमाशानेच महिलांचा धावा केल्याचे दिसुन आले मदमाशांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे.