प्रज्ञा विकास सार्वजनिक वाचनालय येथे २३ एप्रिल-जागतिक ग्रंथ दिवस साजरा.

ऋषी सहारे

संपादक

  दि.२३/०४ /२०२३ ला जागतिक ग्रंथ दिवसाच्या निमित्ताने प्रज्ञा विकास सार्वजनिक वाचनालय, प्रकाश नगर, खापरखेडा येथे सकाळी:-११:०० वाजता लक्ष्मण राठोड मुख्यध्यापक महाराष्ट्र विद्यालय खापरखेडा यांच्या हस्ते विश्वरत्न, डॉ. बाबासाहेब भिमराव रामजी आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून एक दिवशीय पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

   या प्रसंगी राठोड यांनी उद्घाटनप्रसंगी विद्यार्थ्यांना व उपस्थितांना जीवनात यशस्वी होण्यासाठी सात्यत,कठीण परिश्रम व प्रामाणिकता आवश्यक आहे असे मोलाचे मार्गदर्शन केले.

     तसेच प्रमुख उपस्थिती नरेंद्र ठवरे सहाय्यक अभियंता, औ.वि.केंद्र, खापरखेडा यांनी आजच्या कार्यक्रमाचा उद्देश हा वाचन संस्कृती वाढविणे आहे असे सांगितले.

    याप्रसंगी वसाहतितील व बाहेरील विद्यार्थी व पालक,त्याचबरोबर वाचनालयाचे पदाधिकारी , संचालक मंडळ व सभासद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोरेश्वर राठोड

   प्रास्ताविक मोरेश्वर लाडे, सचिव, प्रज्ञा विकास सार्वजनिक वाचनालय,खापरखेडा व आभार मयूर झाडे यांनी मानले.