ब्रेकिंग न्युज… कार व दुचाकीचा अपघात… — नवविवाहीतेचा मृत्यू, पती गंभीर जखमी… — दर्यापूर भातकुली मार्गावरील मेहेरबाबा लॉन जवळील घटना…

युवराज डोंगरे 

खल्लार/प्रतिनिधी

  कार व दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीवरील नवविवाहित पत्नीचा मृत्यू झाला. तर पती गंभीर जखमी  झाल्याची घटना दर्यापूर शहरापासून दिड की.मी अंतरावर दर्यापुर भातकुली मार्गावर मेहरबाबा लॉन नजिक रविवार (दि.२३) दुपारी दिड वाजताच्या सुमारास घडली आहे.

  निकीता कौस्तुभ जीवने (वय.२२) असे अपघातातील मृतक नवविवाहित पत्नीचे नाव आहे तर पती कौस्तुभ उद्धव जीवने (वय.२५ ) गंभीर जखमी झाला आहे. घटनेच्यावेळी कौस्तुभ व पत्नी निकीता हे बुलेट एम.एच.२७ सी.के.७२३४ क्रमांकाच्या दुचाकीने दर्यापुर येथून काही कामानिमीत्त भातकुली मार्गे अमरावती जात होते. दरम्यान दर्यापूर शहरापासून दिड कि.मी अंतरावर मेहरबाबा लॉनच्या अलीकडच्या शेतातील रेचे फॉर्म हाऊस मधून एम.एच.२७ बी.ई ४४२३ क्रमांकाची कार मुख्य रस्त्यावर येत असताना त्याच क्षणी थेट दुचाकी  कार चालकाच्या साईडला जाऊन जोरदार धडकली. या अपघातात दुचाकीवरील दोघेही पती,पत्नी गंभीर जखमी झालेत.घटनेची माहीती मिळताच घटनास्थळी वाहतूक पोलीस पोहचले. उपस्थित नागरिकांनी पोलीसांच्या मदतीने दोन्ही जखमींना उपजिल्हा रुग्णालय,दर्यापूर येथे दाखल करण्यात आले. मात्र दोघाचींही प्रकुती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारा अमरावती येथे स्थानांतरीत केले. दरम्यान वाटेतच पत्नी निकीताचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

गंभीर पती कौस्तुभ याच्येवर अमरावती येथील खाजगी रुगणालयात उपचार सुरु आहेत.             दर्यापूर पोलीसांनी घटनेचा पंचनामा करीत अपघातातील कार व दुचाकी ताब्यात घेतली आहे. या अपघात प्रकरणी दर्यापूर पोलीसांनी नोंद केली असून वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल झाला नव्हता.

बॉक्स

कौस्तुभ जीवने व निकिता जीवने यांचे एक महिन्यापूर्वीच लग्न झाले होते.मात्र अंगावरची हळद सुकण्याआधीच निकीतचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.