निलेश शेंडे, प्रशांत शिंदे, गुरु भगत, खुशी मेश्राम यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन…

प्रेम गावंडे

उपसंपादक

दखल न्युज भारत

             डेव्हलपमेंट अँड रिसर्च एज्युकेशन मल्टीपर्पज सोसायटी (ड्रीम) चंद्रपूर तर्फे समाजिक जाणीव जोपासून मागील 15 वर्षांपासून दरवर्षी निलेश शेंडे, प्रशांत शिंदे, गुरु भगत व खुशी मेश्राम यांच्या वाढदिवसानिमित्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. यावर्षी सुद्धा 24 एप्रिल 2023 रोजी स्थानिक ब्लड बँक, शासकीय सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे सकाळी 11 वाजता रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिराला रक्तदान, नेत्रदान, देहदान, अंधश्रध्दा निर्मूलन चळवळीचे प्रेरक व आमचे मार्गदर्शक इंजिनीयर प्रदीप अडकिने उपस्थित होते. तसेच ब्लड बँक शासकीय रुग्णालय चंद्रपूरचे पवार सर, चांदेकर सर तसेच त्यांचा चमु यांचा मार्गदर्शनात शिबीर संपन्न झाला. या शिबिराला यशस्वी करण्यासाठी ड्रीम चंद्रपूर चे अध्यक्ष प्रेम गावंडे, उपाध्यक्ष अभिजित दुर्गे, सचिव अनिल ठाकरे, कोशाध्यक्ष निलेश शेंडे, धीरज वानखेडे, मोही ठाकरे यांनी परिश्रम घेतले.