शिक्षक भारती प्राथमिक अमरावती जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण सभा संपन्न.

युवराज डोंगरे 

अमरावती(जिल्हा प्रतिनिधी)

 दि.२३/४/२०२३ रोजी जिल्हा परिषद विश्रामगृह अमरावती येथे शिक्षक भारती प्राथमिक जिल्हा अमरावतीच्या जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण सभा जिल्हाध्यक्ष मंगेश खेरडे यांचे अध्यक्षतेखाली तसेच प्रमुख अतिथी संदीप तडस ( राज्य उपाध्यक्ष , शिक्षक भारती ) रविकिरण सदानशिव ( जिल्हा सरचिटणीस, शिक्षक भारती प्राथमिक जिल्हा अमरावती) रामेश्वर खंडारे ( राज्य कार्यकारिणी सदस्य ) यांचे प्रमुख उपस्थिती पार पडली.

   या सभेमध्ये फुले,शाहू आंबेडकर यांच्या स्वातंत्र्य , समता , बंधुता व न्याय या विचारधारेला मानणा-या स्वाभिमानी शिक्षक बांधवांनी शिक्षक भारती मध्ये प्रवेश केला.त्यामध्ये रामेश्वर खंडारे पं.स.नांदगाव खंडेश्वर

मिलीद वाहुरवाघ पं.स. अमरावती, उमेश उदापुरे पं.स. अमरावती,दिपक गणबहादूर पं.स. अमरावती,राजाभाऊ वानखडे पं.स.चांदूर रेल्वे,गजानन सहारे. पं.स.चांदूर रेल्वे,सचिन विटाळकर पं.स. तिवसा,अमोल खंगार पं.स .धारणी,श्रीकांत खाजोने पं.स. मोर्शी

 इत्यादी शिक्षक बांधवांनी संघटनेच्या विचारधारेला प्रेरीत होऊन संघटनेत प्रवेश केला.त्या सर्वांचे मा. अध्यक्ष मंगेश खेरडे तसेच संदीप तडस , मा. रविकिरण सदानशिव यांचे हस्ते पुस्तक,वृक्ष व गुलाब पुष्प देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला.

मिलींद वाहुरवाघ यांची शिक्षक भारती प्राथमिक जिल्हा अमरावती च्या ज्येष्ठ उपाध्यक्ष पदी निवड करीत असल्याचे जिल्हाध्यक्ष मंगेश खेरडे यांनी जाहीर केले.

सभेमध्ये शिक्षक बदली प्रक्रिया २०२३ बाबत विविध सूचना, दर्यापूर शिक्षक पतसंस्था निवडणूक,

 शिक्षकांच्या विविध समस्यां बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

सभेला मा. संदीप तडस ,मा.मंगेश खेरडे , मा. रविकिरण सदानशिव ,मा. रामेश्वरभाऊ खंडारे , मा. चंद्रशेखर रामटेके ( जिल्हा सहसचिव शिक्षक भारती) मा.सतीश डोंगरे ( जिल्हा उपाध्यक्ष शिक्षक भारती) , मा.विनोद वानखडे (जिल्हा कोषाध्यक्ष शिक्षक भारती) , मा.अनिल वानखडे (जिल्हा संघटक शिक्षक भारती) मा.किशोर रुपनारायण ( जिल्हा प्रसिद्धीप्रमुख शिक्षक भारती) , मा.हेमराज गणोरकर (जिल्हा उपाध्यक्ष शिक्षक भारती) , मा.दत्तप्रसाद भेले .(तालुकाध्यक्ष मोर्शी) मा राजू खिराडे ( तालुका अध्यक्ष नादगाव खंडे ) ,मा.मनोहर शेळके (तालुका सचिव नांदगाव खडे) , मा.गजानन सहारे , मा. राजाभाऊ वानखडे,मा.मिलींद वाहुरवाघ ,मा. दिपक गणबहादूर ,मा. अमोल खऺगार मा.सचिन विटाळकर , मा.बाबुराव औघड , मा.सुनिल बैतुले , मा. दिनेश देशमुख ,मा.रविद्र कुरळकर,मा.विजय खंडारकर , मा. सतीश नांदणे मा मोहन निगोट व इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सतीश डोंगरे तर आभारप्रदर्शन मा.विनोद वानखडे यांनी केले.