सहा महिण्याच्या आत आखीव पत्रीका उपलब्ध करून देण्यात येतील… — प्रभारी जिल्हा अधिक्षक भुमिअभिलेख कार्यालय गडचिरोलीच्या नंदा आंबेकर यांचे आश्वासन… — पिंकु बावणेच्या आमरण उपोषणाचे फलीत…

पंकज चहांदे

तालुका प्रतिनिधी

दखल न्यूज भारत

      देसाईगंज शहराची सिमा निश्चित करून आखिव पत्रिका देण्या संदर्भात माजी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष पिंकु बावणे यांनी स्थानिक प्रशासनाला २३ जानेवारी पर्यंतचा अल्टिमेटम दिलेल्या निवेदनातून दिला होता. मात्र या गंभीर बाबीची स्थानिक प्रशासनाने दखलच घेतली नसल्याने अखेर २४ जानेवारी २०२४ पासुन आमरण उपोषणाचे हत्यार उगारताच खळबळुन जागे झालेल्या भुमिअभिलेख कार्यालयाने कामाला गती देत येत्या सहा महिण्याच्या आत आखिव पत्रीका उपलब्ध करून देण्याची हमी प्रभारी जिल्हा अधिक्षक भुमिअभिलेख कार्यालय गडचिरोलीच्या नंदा आंबेकर यांनी दिले असल्याने शहरावाशीयांची मोठी समस्या दुर होणार असून हे पिंकु बावणेच्या आमरण उपोषणाचे फलित असल्याचे बोलल्या जाऊ लागले आहे.

  युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष पिंकु बावणे यांनी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून म्हटले होते की, नगर परिषद देसाईगंज यांनी भुमिअभिलेख कार्यालयाकडे आवश्यक प्रमाणात रक्कम जमा केली आहे. या घटनेला तब्बल ४ वर्षाचा कालावधी लोटुन देखील अद्यापही आखीव पत्रिका देण्यात न आल्याने शहरवाशियांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित राहावे लागत आहे.

      शहरातील कित्येक लोकांची आर्थिक स्थिती हातावर आणुन पानावर खाणारांपैकीची आहे.अशात शासकीय स्तरावरुन देण्यात येत असलेल्या पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकुल योजना तसेच शबरी घरकुल योजनेचा आखीव पत्रीके अभावी लाभ घेता येत नसल्याने अनेकांना झोपडी वजा तंबुत वास्तव्य करावे लागत आहे. ही अतिशय गंभीर बाब लक्षात घेता दि. २३ जानेवारी २०२४ च्या आत समस्या मार्गी लावण्याची भुमिअभिलेख कार्यालयाला विनंती केली होती. मात्र विनंती अर्जाची दखल घेण्यात न आल्याने २४ जानेवारी २०२४ पासुन भुमिअभिलेख कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आमरण उपोषण सुरु केला असता भुमिअभिलेख कार्यालयाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन हमी भरल्याने उपोषण मागे घेण्यात आले.

    यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार आनंदराव गेडाम, देसाईगंजच्या तहसीलदार प्रिती डुडुलकर, भुमिअभिलेख कार्यालय देसाईगंजचे उपअधीक्षक ए.पी.बुद्धे, गडचिरोलीचे योगेश कांबळे, आरमोरीचे एस.एन.पवार, कुरखेड्याचे पि.एल.कुरवाडे, तालुका काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र बुल्ले, डाॅ.नितीन कोडवते, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष लाॅरेन्स गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र गजपुरे, तालुका महासचिव मनोहर निमजे, महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष पुष्पा कोहपरे, महिला काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष आरती लहरी, अरुण कुंभलवार, सागर बन्सोड, लिलाधर भर्रे, सोशल मिडीया प्रमुख मोहित अत्रे, युवक काँग्रेस शहर उपाध्यक्ष विजय पिल्लेवान, सेवादल शहराध्यक्ष भिमराव नगराळे, दुष्यांत वाटगुरे, नरेश लिंगायत, राजु राऊत,शारदा सिडाम, ओबीसी तालुकाध्यक्ष कैलास वानखेडे, आशितोष मोटघरे, गोपाल दिघोरे,विमल धनविजय, महानंदा मोहुर्ले, सुनिता भोयर, लता अलोणे, सुरेखा मटाले, कुंदा लिंगायत, सिंधु खोब्रागडे आदी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.